शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी महिला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2016 03:20 AM2016-11-01T03:20:58+5:302016-11-01T03:20:58+5:30
शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी संगीता विष्णू दळवी, रा.बीड. यांना पहाटे ३ वाजता बीड जिल्ह्यातील आष्टी येथे अटक करण्यात आली.
नंदुरबार : तळोदा आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयात झालेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी संगीता विष्णू दळवी, रा.बीड. यांना पहाटे ३ वाजता बीड जिल्ह्यातील आष्टी येथे अटक करण्यात आली.
याप्रकरणी आधीच प्रकल्प अधिकाऱ्यांसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तुळजा भवानी महिला मंडळ या संस्थेच्या नावावर आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची ६ कोटी ४२ लाख रु पयांची रक्कम तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून बँक खात्यात वर्ग करण्यात आली होती.
हा घोटाळा बाहेर निघाल्यावर ही संस्थाच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या संस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी यापूर्वीच तत्कालीन प्रकल्पाधिकारी शुक्र ाचार्य दुधाळ, दीपचंद संपत पाटील व दिनेश कोळी या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)