दुर्गापूजेनिमित्त राजापुरात एकवटली नारी शक्ती, आरत्यांसह ढोल वादनातून महिलांनी स्मृतिबद्ध केली नवरात्राची एक संध्याकाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 10:04 PM2017-09-24T22:04:12+5:302017-09-24T22:04:27+5:30

‘ती’ दुर्गेचाच अवतार आणि तिच्या हातूनच दुर्गेची आरती.. ‘ती’नं आरती केलीच, शिवाय ढोलवादन करूनही दुर्गेला अभिवादन केलं. उपक्रम होता राजापुरातील दुर्गाशक्तीचा जागर आणि राजापूर शहरातील श्री देव चव्हाटा मित्रमंडळ यांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मंडपात असंख्य ‘ती’ जमल्या. राजापुरातील मित्रमेळा आणि ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या महिलांच्या सामुदायिक आरतीच्या उपक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Women celebrate Dhol, together with women assembled in Rajpura on the occasion of 'Durgapuja', an evening of Navratri | दुर्गापूजेनिमित्त राजापुरात एकवटली नारी शक्ती, आरत्यांसह ढोल वादनातून महिलांनी स्मृतिबद्ध केली नवरात्राची एक संध्याकाळ

दुर्गापूजेनिमित्त राजापुरात एकवटली नारी शक्ती, आरत्यांसह ढोल वादनातून महिलांनी स्मृतिबद्ध केली नवरात्राची एक संध्याकाळ

Next

राजापूर, दि. 24 - ‘ती’ दुर्गेचाच अवतार आणि तिच्या हातूनच दुर्गेची आरती.. ‘ती’नं आरती केलीच, शिवाय ढोलवादन करूनही दुर्गेला अभिवादन केलं. उपक्रम होता राजापुरातील दुर्गाशक्तीचा जागर आणि राजापूर शहरातील श्री देव चव्हाटा मित्रमंडळ यांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मंडपात असंख्य ‘ती’ जमल्या. राजापुरातील मित्रमेळा आणि ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या महिलांच्या सामुदायिक आरतीच्या उपक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुमारे दीडशेपेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत विविध पारंपरिक आरत्यांची सेवा दुर्गा मातेच्या चरणी रुजू केली. सायंकाळी ७ वाजता उपस्थित महिलांच्या हस्ते देवीची धुपारती होऊन आरती जागराला सुरुवात झाली. विविध पारंपरिक आरती म्हणून श्री शिव छत्रपती आणि भारत मातेच्या आरतीने ७.४५ला आरतीची सांगता झाली. त्यानंतर राजापुरातील पहिल्या ढोल पथकाने अत्यंत दमदार आणि तालबद्ध वादन सादर करत अंबेचा गजर केला.
आरतीच्या निमित्तानं अधिकाधिक महिलांना एकत्र आणण्याची कल्पना ‘लोकमत’ने मांडली आणि मित्रमेळाच्या धडपड्या सदस्यांनी ती उचलून धरत नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीही केली. मित्रमेळाचे सर्व पदाधिकारी त्यात उत्साहाने सहभागी झाले होते. विविध उपक्रमांमधून आपली स्वतंत्र ओळख करणा-या मित्रमेळाने आणखी एक उपक्रम यशस्वी केला.

Web Title: Women celebrate Dhol, together with women assembled in Rajpura on the occasion of 'Durgapuja', an evening of Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.