योजनांच्या केंद्रस्थानी महिलाच - मुख्यमंत्री
By admin | Published: March 9, 2017 02:01 AM2017-03-09T02:01:44+5:302017-03-09T02:01:44+5:30
देशाच्या मानव संसाधनात ५० टक्के महिलांना प्रशिक्षण देऊन सहभागी करुन घेतले आणि त्या अर्थव्यवस्थेचा भाग झाल्या तर देशाची प्रगती झपाट्याने होते. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने
मुंबई : देशाच्या मानव संसाधनात ५० टक्के महिलांना प्रशिक्षण देऊन सहभागी करुन घेतले आणि त्या अर्थव्यवस्थेचा भाग झाल्या तर देशाची प्रगती झपाट्याने होते. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने महिलांना केंद्रस्थानी ठेऊन योजना राबवण्यास प्राध्यान देत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभाग आणि ग्राम विकास विभागाच्या वतीने आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते. मानवी व्यापार रोखण्यासाठीच्या कृती आराखडा आणि यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले. मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रेंट अ होम’ या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. महिला बाल विकास विभागाने सुरू केलेला ‘इलेक्ट्रॉनिक फिजिओ ग्रोथ मॉनिटिरिंग सिस्टिम’च्या माध्यमातून बालकांच्या आरोग्याचे आॅनलाईन ट्रॅकिंग सिस्टीममुळे कुपोषणावर मात करण्यासाठी उपाययोजना करता येतील. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ सारखी योजना असेल किंवा महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आखलेल्या योजनांमुळे महिलांचे सक्षमीकरण होणार आहेत. महिलांच्या गर्भाशयाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी विभागाने तयार केलेल्या लसीकरण उपक्रमास राज्य शासन व आरोग्य विभाग मदत करेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज समाजातील सर्वच स्तरात महिलांना नाकारण्याचे स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे घडत असलेले प्रकार निंदनीय आहेत. अशा घटनांविरुद्ध राज्य शासन कठोर पावले उचलत आहे. (प्रतिनिधी)