...तरच या कायद्याचा वचक बसू शकेल; वंशाच्या दिव्यासाठी २२% महिलांचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 09:25 AM2021-12-08T09:25:47+5:302021-12-08T09:26:38+5:30
२०१९ साली राज्यात एकूण ८,४३० तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यात एकूण ८,५६१ पीडिता होत्या.
रवींद्र राऊळ
केवळ वंशाला दिवाच हवा, या अट्टाहासापायी महिलांचा अनन्वित छळ होत असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायद्यान्वये पोलिसात दाखल होणाऱ्या एकूण तक्रारींपैकी तब्बल २२ टक्के तक्रारी या वंशाला दिवा हवा म्हणून करण्यात येणाऱ्या छळासंबंधित आहेत.
२०२० मध्ये कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे : ६७२९
वंशाला दिवाच हवा म्हणून छळ झालेल्या महिला : १४८०
कौटुंबिक हिंसाचारात छळाची वेगवेगळी कारणे : ७३
२०१९ साली राज्यात एकूण ८,४३० तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यात एकूण ८,५६१ पीडिता होत्या. त्यात १,८५४ प्रकरणात मुलगा होत नसल्याने छळ केल्याचे म्हटले होते. २०१८ साली एकूण ६,८६२ प्रकरणांमध्ये पती अथवा त्याच्या नातेवाईकांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यात ६,८८२ पीडिता होत्या तर त्यातील १,५०९ प्रकरणांमध्ये मुलगा होत नसल्याचे कारण होते.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाचा अहवाल काय सांगताे?
तब्बल ७८.८ टक्के महिला अत्याचार झाला हेच सांगत नाहीत, ७.८ टक्के प्रकरणांत महिला कोणतीही मदत घेत नाहीत. केवळ १८.८%
प्रकरणांतच महिला संबंधित यंत्रणांकडे मदत मागतात. यामुळे समाजात घडणाऱ्या छळसत्राचे प्रमाण कित्येक पटींमध्ये
कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांत खटल्याचा निकाल लावला तरच या कायद्याचा वचक बसू शकेल. - ॲड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या
अशा तक्रारी संवेदनशीलपणे हाताळल्या जातात. त्यामुळे महिलांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, त्याची दखल घेतली जाईल.
- संजय पांडे, पोलीस महासंचालक
न्याय का मिळत नाही?
पोलिसांकडून दिरंगाई/राजकीय दबाव
तक्रार दाखल करून घेण्यास विलंब
दोन-दोन महिने ताटकळत ठेवणे