कोविड सेंटरमध्ये महिला असुरक्षित? भाजपा महिला मोर्चा उद्या करणार राज्यव्यापी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 08:48 PM2020-09-21T20:48:58+5:302020-09-21T20:55:54+5:30

‘‘राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे..

Women insecure in Covid Center in the state? BJP Mahila Morcha statewide agitation on September 22 | कोविड सेंटरमध्ये महिला असुरक्षित? भाजपा महिला मोर्चा उद्या करणार राज्यव्यापी आंदोलन

कोविड सेंटरमध्ये महिला असुरक्षित? भाजपा महिला मोर्चा उद्या करणार राज्यव्यापी आंदोलन

Next
ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी : राज्यातील विविध शहरांमधील कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये महिला रुग्णांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी, कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिला सुरक्षित नाहीत का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने दिनांक २२ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी दिली.

उमा खापरे म्हणाल्या,‘‘राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिला असुरक्षित आहेत. त्याठिकाणी महिलांवर अत्याचार व छेडछाड केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करूनदेखील त्यांनी याची दखल घेतली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक प्रशासनालाही महिलांच्या सुरक्षेबाबत काही देणेघेणे नाही. यातून सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे स्पष्ट होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या विरोधात उद्या आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना भाजप महिला मोर्चाच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे.’

Web Title: Women insecure in Covid Center in the state? BJP Mahila Morcha statewide agitation on September 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.