‘खाकी’त महिला आठ टक्केच

By admin | Published: March 8, 2016 03:05 AM2016-03-08T03:05:07+5:302016-03-08T09:34:46+5:30

शासकीय सेवा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सबलीकरणाचे वारे जोरात वाहत असताना समाजातील महत्त्वाचा घटक असलेले पोलीस दल मात्र, त्याबाबत दुर्लक्षित राहिले आहे.

The women in 'Khakee' are eight percent | ‘खाकी’त महिला आठ टक्केच

‘खाकी’त महिला आठ टक्केच

Next

जमीर काझी,  मुंबई
शासकीय सेवा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सबलीकरणाचे वारे जोरात वाहत असताना समाजातील महत्त्वाचा घटक असलेले पोलीस दल मात्र, त्याबाबत दुर्लक्षित राहिले आहे. बहुतांश सरकारी नोकऱ्यांमध्ये तरुणींचा सहभाग झपाट्याने वाढत असताना, ‘खाकी वर्दी’मधील महिलांचे प्रमाण जेमतेम आठ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे. महाराष्ट्रातील २ लाख ६ हजार ९६९ पोलिसांच्या फौजफाट्यात ‘सावित्रीं’ची संख्या जेमतेम २५ हजार ३११ इतकी आहे. विशेष म्हणजे, महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्याशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण ६० टक्क्यांवर असताना काही अपवाद वगळता, या प्रकरणाचा तपास पुरुष मंडळींकडूनच केला जातो.
पोलीस दलात महिलांसाठी ३३ टक्के जागेची तरतूद असली, तरी हे प्रमाण आतापर्यंतच्या कोणत्याच भरतीत भरले गेलेले नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे, त्यासाठी गृहविभागाकडून कोणतेही विशेष प्रयत्न केले गेलेले नाहीत. राज्यात शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्व विभागांत महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत राहिली आहे. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये त्यांच्यासाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्याने, सर्वत्र महिलांचा बोलबाला दिसून येत आहे.
सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्याने, अन्य खात्यातील भरतीवेळी तरुणांबरोबरच उमेदवार तरुणींची संख्या जागांच्या तिप्पट, चौपटीने असते. खाकी वर्दी मात्र, त्यासाठी अपवाद आहे. केवळ कॉन्स्टेबलच नव्हे, तर स्पर्धा परीक्षांद्वारे निवडल्या जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्येही महिलांचे प्रमाण नगण्य आहे. यूपीएससी व एमपीएससीला बसणाऱ्या तरुणींची संख्या वाढत असली, तरी त्या
पोलीस सेवेपेक्षा अन्य नागरी सेवेला प्राधान्य देतात. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांची वानवा जाणवत आहे.
राज्य पोलीस दलात सध्या मीरा बोरवणकर या एकमेव महिला महासंचालक पदावर (विधि व तंत्रज्ञान) कार्यरत आहेत. रेल्वे संरक्षण दलामध्ये प्रतिनियुक्तीसाठी त्या इच्छुक असल्या, तरी त्याबाबत केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
त्यांच्यानंतर रश्मी शुक्ला व प्रज्ञा सरवदे या ज्येष्ठ अधिकारी असून, अनुक्रमे राज्य गुप्त वार्ताच्या आयुक्त व सिडकोमध्ये दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर, अर्चना त्यागी या मुख्यालयात विशेष महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून कार्यरत आहेत. शुक्ला यांचे नाव पुणे आयुक्त पदासाठी, तर त्यागी यांचे मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेसाठी चर्चेत आहे. मात्र, अन्य मातब्बर अधिकारीही त्यासाठी इच्छुक असल्याने, त्यांची वर्णी लागण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते.
पोलीस दलात आजमितीला महासंचालक दर्जाच्या एक, अप्पर महासंचालक पदावर (एडीजी) दोन व विशेष महानिरीक्षक (आयजी) पदावर एक महिला कार्यरत आहे. उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदावर एकही महिला नाही, तर डीसीपी म्हणून २९ तर उपअधीक्षक/सहायक आयुक्त दर्जाच्या ३४ महिला अधिकारी विविध ठिकाणी कार्यरत आहेत. तर निरीक्षक व सहायक निरीक्षक पदी अनुक्रमे २२९ व ३८६ इतक्या महिला आहेत. त्यापैकी मोजक्या जणींचा अपवाद वगळता उर्वरितांची नेमणूक कमी महत्त्वाच्या किंवा मुख्यालय, नियंत्रण कक्ष अशा ठिकाणीच आहे.
> ३१ जानेवारी २०१६ पर्यंतचे पोलीस दलातील महिलांचे प्रमाण
पदसंख्या
महासंचालक१
अप्पर महासंचालक२
विशेष महानिरीक्षक१
उपमहानिरीक्षक०
अधीक्षक/अ. अधीक्षक२९
उपअधीक्षक/ एसीपी ३४
पोलीस निरीक्षक२२९
सहायक निरीक्षक३८६
उपनिरीक्षक१३०२
सहायक फौजदार२५२
हवालदार१०५८
नाईक३८१६
कॉन्स्टेबल१८,२६५
एकूण२५,३११

Web Title: The women in 'Khakee' are eight percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.