दारूबंदीसाठी महिला रस्त्यावर

By admin | Published: July 19, 2016 12:51 AM2016-07-19T00:51:11+5:302016-07-19T00:51:11+5:30

भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी सोमवारी बालगंधर्व रंगमंदिराजवळील राणी लक्ष्मीबाई चौकात मानवी साखळी करून दारूबंदीसाठी आंदोलन केले.

For women for pistachios, in the streets | दारूबंदीसाठी महिला रस्त्यावर

दारूबंदीसाठी महिला रस्त्यावर

Next


पुणे : दारूबंदी झालीच पाहिजे.... आमची मागणी मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा... अशा घोषणा देत भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी सोमवारी बालगंधर्व रंगमंदिराजवळील राणी लक्ष्मीबाई चौकात मानवी साखळी करून दारूबंदीसाठी आंदोलन केले. कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईचीही मागणी करण्यात आली.
संघटनेच्या पुण्याच्या अध्यक्षा दुर्गा शुक्रे म्हणाल्या, ‘‘दारूमुळे आज अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. अनेकांचे नवरे आज दारू पिऊन गेल्याने एकटीने संसाराचा गाडा ओढण्याची वेळ महिलांवर येते. हे प्रकार बंद व्हावेत यासाठी गावागावांतून याविषयी जनजागृती मोहीम राबविण्याचे संघटनेने ठरवले आहे.’’
संघटनेच्या संघटक कमल सावंत, प्रियंका जगताप, पुष्पक केवडकर व अनेक महिला उपस्थित होत्या. भूमाता ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाने हे आंदोलन करण्यात आले.
मुळीक म्हणाले, ‘‘ग्रामीण भागामधे दुष्काळानंतरच सर्वांत मोठा प्रश्न दारूचा आहे. इतर राज्यात दारूबंदी होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही?’’
राज्य सरकारला यामधून महसूल मिळतो म्हणून दारूवर बंदी येणार नसेल तर त्यविरोधात लढा द्यावाच लागेल. दारूबंदी झाल्यास सामाजिक सुरक्षा नक्कीच वाढेल. यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यायला हवा. त्या एकत्रित लढल्या तर मुलगा आणि नवरा दारू पिऊन घरी येणार नाहीत.
कर्जतमधील मुलीवर अत्याचार करणारे नितीन भैलुमे, संतोष भवाळ आणि पप्पू शिंदे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली. (प्रतिनिधी)
कर्जतमध्ये नुकत्याच झालेल्या प्रकरणाचे मूळही दारूतच आहे. दारू प्यायलेले पुरुष महिलांवर बलात्कार, अत्याचार करतात. यामध्ये महिलेचा विनाकरण बळी जातो. १५ आॅगस्टच्या आत दारूबंदी झाली पाहिजे; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत. - प्रियंका जगताप

Web Title: For women for pistachios, in the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.