महिला पीएसआयला महिलेची धक्काबुक्की

By admin | Published: October 3, 2016 05:12 AM2016-10-03T05:12:23+5:302016-10-03T05:12:23+5:30

शहर व उपनगरात पोलिसांना मारहाण, धक्काबुक्की करण्याच्या घटना सुरूच आहेत.

Women push woman to PSI | महिला पीएसआयला महिलेची धक्काबुक्की

महिला पीएसआयला महिलेची धक्काबुक्की

Next


मुंबई : शहर व उपनगरात पोलिसांना मारहाण, धक्काबुक्की करण्याच्या घटना सुरूच आहेत. वाहतूक सेवा सुरळीत करीत असलेल्या एका महिला उपनिरीक्षकाला एका वाहनस्वार महिलेने नखाने ओरबाडून धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी रात्री गिरगावातील सी.पी.टॅँक सर्कलजवळ घडली. याप्रकरणी प्रेमलता रमेश बनसाळी (४६ ) या महिलेविरुद्ध व्ही.पी.रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरगावातील सी.पी.टॅँक सर्कलजवळ उपनिरीक्षक शुभांगी मालुसरे या सहकाऱ्यांसमवेत शनिवारी ड्युटी करीत होत्या. तेथून मोपेडवरून विनाहेल्मेट जात असलेल्या प्रेमलता बनसाळी यांना त्यांनी अडविले. लायसन्सची विचारणा केली असताना ते नव्हते. त्यामुळे त्यांनी हेल्मेट व लायसन्स न बाळगल्याबाबत पावती करून दंड भरण्यास सांगितले असता या महिलेने नकार दिला. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी प्रेमलता बनसाळीने उपनिरीक्षक मालुसरे यांच्या उजव्या हाताला नखाने ओरबाडून ढकलून दिले. मालुसरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार व्ही.पी.रोड पोलिसांनी प्रेमलता बनसाळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Women push woman to PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.