त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करणा-या स्वराज्य संघटनेच्या महिलांना मारहाण
By admin | Published: April 20, 2016 02:29 PM2016-04-20T14:29:32+5:302016-04-20T14:31:51+5:30
त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात चौथ्यांदा दर्शनासाठी प्रवेश करण्यासाठी जात असताना स्वराज्य संघटनेच्या अध्यक्षांसह इतर महिलांना मारहाण करण्यात आली.
Next
>चार माजी नगराध्यक्षांविरूद्ध गुन्हा दाखल : गर्भगृहात चौथ्यांदा प्रवेश फसला
त्र्यंबकेश्वर, दि. २० - येथील मंदिराच्या गर्भगृहात बुधवारी पहाटे चौथ्यांदा दर्शनासाठी प्रवेश करण्यासाठी जात असताना स्वराज्य संघटनेच्या अध्यक्ष वनिता गुट्टे यांच्यासह त्यांच्याबरोबरच्या महिलांना मारहाण केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वरच्या चार माजी नगराध्यक्षांसह इतर ग्रामस्थांविरूद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय तुंगार, योगेश (पिंटू) तुंगार, प्रशांत तुंगार आणि अनघा फडके अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्ष वनिता गुट्टे यांच्यासह सदस्यांचा बुधवारी पहाटे सहा वाजता त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा प्रवेश चौथ्यांदा फसला. त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश मिळावा यासाठी स्वराज्य महिला संघटनेतर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी अनेक वेळा बैठका व चर्चा झाल्या, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. बुधवारी पहाटे सहा वाजता मंदिरात येऊनही अंगावर ओले वस्त्र नाही, या कारणास्तव पुनश्च चौथ्यांदा गुट्टे यांच्यासह त्यांच्या सहकारी सदस्यांना परत पाठवून देण्यात आले. परंतु सात वाजेपर्यंत महिलांना प्रवेश देण्यात आला नाही. गुट्टे यांच्यासह महिलांना ओढत ओढत मंदिराबाहेर पाठविण्यात आले. आपल्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. गर्भगृह मुद्दाम अडवून ठेवण्यात आले. गावातील महिला रांगेत घुसून मुद्दाम अडवणूक करतात, महिलांनाच नव्हे तर लहान मुलांनाही मारहाण केल्याचा आरोप गुट्टे यांनी केला आहे. मंदिरात वाद सुरू असताना महिला पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली, त्यामुळेच आम्हाला कोणी वाचविण्यात आले नसल्याचा आरोप गुट्टे यांनी केला आहे. या महिला मंदिराबाहेर पडल्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. यावेळी दुस:यांदा पोलिसात गुन्हा दाखल केली आहे. यापूर्वी गावातील नागरिक, देवस्थान विश्वस्त, नगरसेवक, महिला यांच्यासह 25क् जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
---------------------
आम्ही महिलांवर हात टाकलेला नाही. आणि टाकणारही नाही. आम्ही महिलांचा आदर करणारे आहोत. रांगेत नंबरवरून भाविकांची आणि त्यांची काहीतरी बाचाबाची झाली , त्यात प्रकरण हाणामारीर्पयत पोहोचेले, त्यात बराच कालावधी गेल्याने सदर महिला गर्भगृहार्पयत जाऊ शकल्या नाहीत. म्हणून त्यांना सकाळी सात वाजेनंतर गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यापासून रोखण्यात आले.
- धनंजय तुंगार, योगेश तुंगार, त्र्यंबकेश्वर