एक्स्प्रेसमध्येही महिला टीसी

By admin | Published: March 8, 2017 02:18 AM2017-03-08T02:18:24+5:302017-03-08T02:18:24+5:30

फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वे प्रशासनाचे उत्पन्न बुडत असतानाच त्यांच्याविरोधात कारवाईदेखील केली जाते. ही कारवाई करताना स्थानकात पुरुषांबरोबरच महिला टीसीदेखील

Women Tc in Express | एक्स्प्रेसमध्येही महिला टीसी

एक्स्प्रेसमध्येही महिला टीसी

Next

मुंबई : फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वे प्रशासनाचे उत्पन्न बुडत असतानाच त्यांच्याविरोधात कारवाईदेखील केली जाते. ही कारवाई करताना स्थानकात पुरुषांबरोबरच महिला टीसीदेखील (तिकीट तपासनीस) असतात. परंतु मेल-एक्स्प्रेसमध्ये महिला टीसी दिसत नाहीत. यात बदल करत आता पश्चिम रेल्वेने मेल-एक्स्प्रेसमध्येही महिला टीसींना तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये नीरू वाधवा आणि राधा अय्यर अशा दोन महिला टीसी बुधवारपासून तैनात होतील. प्रयोग यशस्वी होताच आणखी २0 महिला टीसींना जबाबदारी सोपवली जाईल. एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लास डब्यात महिला टीसींना तैनात करण्यात येणार आहे. याची व्याप्ती वाढवण्यासाठी स्लीपर व सर्वसाधारण डब्यातही महिला टीसींना तैनात केले जाऊ शकते का, याची चाचपणी होईल.
त्यांच्यासोबत रेल्वे सुरक्षा दलाचा जवानही तैनात केला जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women Tc in Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.