पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:10 AM2024-11-05T07:10:21+5:302024-11-05T07:13:07+5:30

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. तर पाच जिल्हे असे आहेत जेथे महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. 

Women will be kingmakers in five districts, women's vote will be decisive in 19 assembly constituencies, highest number of women voters in Ratnagiri district; | पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार

पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार

 मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. तर पाच जिल्हे असे आहेत जेथे महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. 

यामध्ये रत्नागिरी (५ मतदारसंघ), नंदुरबार (४), गोंदिया (४), भंडारा (३) आणि सिंधुदुर्ग (३) या जिल्ह्यांचा समावेश आहे.  त्यामुळे या पाच जिल्ह्यांमधील एकूण १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये नारीशक्ती ही आपला आमदार निवडण्यासाठी किंगमेकर ठरणार आहे. 

महिलांचा सत्तेतील वाटा पाहिला तर गेल्या निवडणुकीत राज्यातून २४ महिला विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. हे प्रमाण २८८ आमदारांमध्ये अवघे ७ टक्के एवढे राहिले आहे. 

राज्यातील मतदारांची संख्या  
पुरुष    ५,२२,७३९ 
महिला    ४,६९,९६,२७९ 
तृतीयपंथी    ६,१०१ 

या जिल्ह्यांची मतदारसंख्या अधिक 
    पुणे    ८८,४९,५९० 
    मुंबई उपनगर    ७६,८६,०९८ 
    ठाणे    ७२,२९,३३९
    नाशिक    ५०,६१,१८५
    नागपूर    ४५,२५,९९७ 

या जिल्ह्यात महिला मतदार अधिक 
जिल्हा    एकूण मतदार    पुरुष    महिला    तृतीयपंथी 
रत्नागिरी    १३,३९,६९७    ६,४६,१७६    ६,९३,५१०    ११        
नंदुरबार    १३,२१,६४२    ६,५४,४१२    ६,६७,२१७    १३
गोंदिया    ११,२५,१००    ५,५३,६८५    ५,७१,४०५    १०
भंडारा    १०,१६,८७०    ५,०६,९७४    ५,०९,८९२    ४   
सिंधुदुर्ग    ६,७८,९२८    ३,३६,९९१    ३,४१,९३४    ३ 

या जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार 
सोलापूर    ३८,४८,८६९ 
अहिल्यानगर    ३७,८३,९८७ 
जळगाव    ३६,७८,११२ 
कोल्हापूर    ३३,०५,०९८ 
छत्रपती संभाजीनगर    ३२,०२,७५१  
 

Web Title: Women will be kingmakers in five districts, women's vote will be decisive in 19 assembly constituencies, highest number of women voters in Ratnagiri district;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.