राजू पाटील महायुती सरकारवर कडाडले! म्हणाले, "स्त्रिया हातात शस्त्र घेऊन..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:00 PM2024-08-26T12:00:57+5:302024-08-26T12:04:38+5:30
Raju Patil MNS: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे महाराष्ट्राच्या राजकारणातही पडसाद उमटले आहेत. विरोधकांकडून महायुती सरकारला लक्ष्य केले जात असून, आता मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Raju Patil Badlapur Sexual Abuse: बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर झालेल्या अत्याचारावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले आहेत. महिला सुरक्षेच्या मुद्द्यासह इतर काही विषयांवर बोट ठेवत आमदार राजू पाटील यांनी एक कविता पोस्ट केली आहे.
कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची कविता सोशल मीडियावर पोस्ट करताना आमदार राजू पाटील यांनी सरकारला सुनावले आहे.
सरकारला जाग आली नाही, तर...; राजू पाटील काय म्हणाले?
आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे की, "राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभार, महिलांना सुरक्षितता देण्यासाठीची अपुरी राजकीय इच्छाशक्ती आणि त्यामुळे जनतेची होणारी ससेहोलपट महाराष्ट्रात धगधगत्या ज्वालामुखीचं रूप घेत आहे. अजूनही सरकारला जाग आली नाही, तर मूक आक्रोश करणाऱ्या स्त्रिया हातात शस्त्र घेऊन मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाहीत."
राजू पाटील यांनी शेअर केलेली 'ती' कविता
छोडो मेहँदी खडक संभालो
खुद ही अपना चीर बचा लो
द्यूत बिछाये बैठे शकुनि
मस्तक सब बिक जायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे
कब तक आस लगाओगी तुम
बिक़े हुए अखबारों से,
कैसी रक्षा मांग रही हो
दुशासन दरबारों से|
स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं
वे क्या लाज बचायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|
कल तक केवल अँधा राजा
अब गूंगा बहरा भी है
होठ सी दिए हैं जनता के,
कानों पर पहरा भी है|
तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे
किसको क्या समझायेंगे?
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|
राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभार, महिलांना सुरक्षितता देण्यासाठीची अपूरी राजकीय इच्छाशक्ती आणि त्यामुळे जनतेची होणारी ससेहोलपट महाराष्ट्रात धगधगत्या ज्वालामुखीचं रूप घेत आहे. अजूनही सरकारला जाग आली नाही तर मूक आक्रोश करणाऱ्या स्त्रिया हातात शस्त्र घेऊन मैदानात उतरल्याशिवाय राहणार… pic.twitter.com/ZzE8f5JpY3
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 26, 2024
मोदींनी व्यक्त केली चिंता, हलगर्जीपणा करणाऱ्यांना इशारा
महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. "मी देशातील प्रत्येक राजकीय पक्षांना, राज्यातील सरकारांना आवाहन करतो की, महिलांवरील हिंसा अक्षम्य पाप आहे; दोषी कुणीही असो, तो वाचता कामा नये. त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करणारे सुटता सुटायला नको", असे मोदी म्हणाले होते.
"रुग्णालये असो, शाळा असो, कार्यालये असो वा पोलीस प्रशासन, ज्या पातळीवर कामचुकारपणा होईल, त्या सगळ्यांचा हिशोब व्हायला हवा. वरपासून खालपर्यंत स्पष्ट मेसेज जायला पाहिजे. हे खूप अक्षम्य आहे. सरकार येतील आणि जातील. पण, जीवनाची आणि महिलेच्या सन्मानाचे रक्षण, हे समाज आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे", असे भाष्य पंतप्रधान मोदींनी केले होते.