त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात महिलांचा प्रवेश

By admin | Published: April 22, 2016 04:19 AM2016-04-22T04:19:11+5:302016-04-22T04:19:11+5:30

शनिचौथरा, कोल्हापूरची अंबाबाई यांच्यापाठोपाठ त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यातही महिलांनी गुरुवारी प्रवेश करून नवीन इतिहास निर्माण केला

Women's admission in Trimbakeshwar village | त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात महिलांचा प्रवेश

त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात महिलांचा प्रवेश

Next

ऐतिहासिक विजय
त्र्यंबकेश्वर : शनिचौथरा, कोल्हापूरची अंबाबाई यांच्यापाठोपाठ त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यातही महिलांनी गुरुवारी प्रवेश करून नवीन इतिहास निर्माण केला. गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न चारवेळा हाणून पाडण्यात आल्यानंतर सकाळी स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्ष वनिता गुट्टे यांच्यासह चार महिलांनी गाभाऱ्यात जाऊन त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवत घटनेचा निषेध करीत त्र्यंबकेश्वर बंदची हाक दिली होती.
त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यातही महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे अशी मागणी करीत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सर्वप्रथम येथे येऊन आंदोलन छेडले होते. परंतु त्यांच्या दोन्ही वेळच्या दौऱ्यात देसाई यांना कडव्या विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यानंतरच्या काळात स्वराज्य महिला संघटनेच्या वनिता गुट्टे व त्यांच्या सहकारी महिलांनी हे आंदोलन पुढे नेले.
विश्वस्तांना रडू कोसळले!
ज्येष्ठ विश्वस्त यादवराव तुंगार, अ‍ॅड. श्रीकांत गायधनी, सुचिंद्र पाचोरकर आदींच्या प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. विश्वस्त यादवराव तुंगार, राजाभाऊ जोशी यांना अक्षरश: रडू कोसळले.

Web Title: Women's admission in Trimbakeshwar village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.