अभिषेक सुरू करणार महिला कबड्डी लीग
By admin | Published: May 10, 2014 12:38 AM2014-05-10T00:38:56+5:302014-05-10T00:38:56+5:30
मी जर अभिनेता नसतो, तर फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवली असती, अशी भावना अभिषेकने व्यक्त केली.
पूजा सामंत
मुंबई आयपीएलमुळे क्रिकेटसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाला प्रचंड ग्लॅमर प्राप्त झालंय. करोडो रु पयांचे व्यवहार त्यात गुंतले असताना अलीकडच्या काळात कबड्डीसारख्या भारतीय आणि तितक्याच लोकिप्रय खेळांना वैभव येणार, अशी सुचिन्हे दिसताहेत. एवढच्ां काय; पण अभिषेक बच्चन ज्याने आयपीएलच्या धर्तीवर कबड्डी जयपूर फ्रॅन्चायझी सुरू केल्याने एकूणच कबड्डीला गतवैभव मिळणार, याची नांदी आज जबोंग डॉट कॉम आणि एनबीए यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत करताना सदिच्छा दूत म्हणून असलेला अभिनेता अभिषेक बच्चन याने सांगितले, की क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय खेळ तर खरंच; पण कबड्डीसारख्या भारतीय खेळाची परवड होते, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कबड्डीला पुन्हा तिची शान मिळावी आणि महिला कबड्डीला उत्तेजन मिळावं, या हेतूने कबड्डीची फ्रॅन्चायझी आम्ही घेतलीय. आमच्या कुटुंबात आता महिला राज अधिक झालंय, माझी लेक आराध्या हिच्या जन्मानंतर मला प्रकर्षानं जाणीव झाली, की मुलींच्या कबड्डीला अतिशय गांभीर्याने घ्यायला हवे. आराध्यात विविध आणि भारतीय खेळांविषयी आवड निर्माण व्हायला हवी. आजही आपल्या देशात स्पोर्ट्सकडे करिअरच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने पाहिलं जात नसल्याची जुनिअर बच्चनला खंत वाटते. शाळेच्या अथवा घराजवळच्या मैदानात मुलांनी खेळणं म्हणजे अभ्यासाचा वेळ फुकट घालवणं, ही चुकीची धारणा आहे आणि ती लवकरात लवकर बदलली पाहिजे. मी जर अभिनेता नसतो, तर फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवली असती, अशी भावना अभिषेकने व्यक्त केली.
खेळांकडे करिअरच्या अनुषंगाने पाहण्याची वेळ आलीय ! - अभिषेक बच्चन
मी अभिनेता नसतो, तर फुटबॉल खेळाडू असतो !