महिला वकिलाचे अपहरण करून तीन महिने अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 02:50 AM2017-09-25T02:50:20+5:302017-09-25T02:50:44+5:30

सरकारी वकील होण्यासाठीच्या स्पर्धेतून एका महिला वकिलाचे अपहरण करून तीन महिने तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरात उघडकीस आली आहे.

Women's lawyer abducted for three months | महिला वकिलाचे अपहरण करून तीन महिने अत्याचार

महिला वकिलाचे अपहरण करून तीन महिने अत्याचार

Next

गोंदिया : सरकारी वकील होण्यासाठीच्या स्पर्धेतून एका महिला वकिलाचे अपहरण करून तीन महिने तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गोंदिया पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केले असून एक पत्रकार व अन्य एक वकीलच या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचे कळते.
एका ३६ वर्षिय महिला वकिलाने सरकारी वकील होण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या स्पर्धेत अ‍ॅड. प्रकाश ताराचंद तोलानी हेसुद्धा होते. अ‍ॅड. तोलानी व पीडित वकील महिलेशी वैमनस्य असलेले पत्रकार इंद्रकुमार राही या दोघांनी कट रचून जुल्फीकार जब्बार गणी ऊर्फ छोटू याला सुपारी दिली. त्याने साथीदारांच्या मदतीने ७ जून २०१७ च्या सकाळी न्यायालयात जात असलेल्या पीडितेचे अपहरण केले, असे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी जुल्फीकार जब्बार गणी, प्रकाश तोलाणी (३४), इंद्रकुमार एच. राही (५५), बाबा जब्बार गणी (४०), गोलू गणी (३०), आशीष मिश्रा (४०), अन्नु करियार (३५), अक्की अग्रहरी (३०) व अन्य तीन अशा ११ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Web Title: Women's lawyer abducted for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.