महिला आमदाराने पोलिसांत जमा केली लाचेची रक्कम!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:12 AM2017-08-11T04:12:30+5:302017-08-11T04:12:30+5:30

विक्रोळी; मुंबई येथील एका एसआरए गृहनिर्माण प्रकल्पासंबंधी गप्प बसण्यासाठी एका बिल्डरने आपल्याला एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करणारे आरटीआय कार्यकर्ते संदीप येवले यांनी त्यातील चार लाखाची रक्कम काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना देऊन सदर प्रकरणास विधानसभेत वाचा फोडण्याची विनंती केली.

 Women's MLA deposited the police amount! | महिला आमदाराने पोलिसांत जमा केली लाचेची रक्कम!  

महिला आमदाराने पोलिसांत जमा केली लाचेची रक्कम!  

Next

मुंबई : विक्रोळी; मुंबई येथील एका एसआरए गृहनिर्माण प्रकल्पासंबंधी गप्प बसण्यासाठी एका बिल्डरने आपल्याला एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करणारे आरटीआय कार्यकर्ते संदीप येवले यांनी त्यातील चार लाखाची रक्कम काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना देऊन सदर प्रकरणास विधानसभेत वाचा फोडण्याची विनंती केली. स्वत: ठाकूर यांनीच आज हा गौप्यस्फोट केला. तसेच चार लाखाची रक्कम त्यांनी कफपरेड पोलीस ठाण्यात सायंकाळी जमा केली.
आ. ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की, मी मनोरा आमदार निवासातून विधानभवनाकडे येत असताना येवले माझ्याजवळ आले आणि त्यांनी एक कोटीच्या लाचप्रकरणाची माहिती आपल्याला दिली. हा पैसा सरकारला परत करण्याची आपली इच्छा आहे पण ती कोणीही स्वीकारत नाही.
तेव्हा आपण हे प्रकरण विधानसभेत उचला असे सांगत येवले यांनी आपल्याला चार लाख रुपये दिले. येवलेंकडील लाचेची संपूर्ण रक्कम सरकारने आपल्या तिजोरीत जमा करायला हवी, अशी आपलीही मागणी आहे. त्यांनी आपल्याला दिलेले चार लाख रुपये आपण पोलीस ठाण्यात जमा केले आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले. या लाच प्रकरणी सरकारने संबंधित बिल्डरला तातडीने अटक करावी या मागणीसाठी अपक्ष आमदार बच्चू कडू आणि संदीप येवले यांनी काही समर्थकांसह आज विधानभवनाबाहेर घोषणाबाजी केली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. यशोमती ठाकूर यांनी हे गौप्यस्फोट विधानसभेतही करण्याचा प्रयत्न केला.

Web Title:  Women's MLA deposited the police amount!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.