स्त्रीशक्तीचा अनोखा कलाविष्कार, मुंबईत कलाप्रदर्शन

By admin | Published: March 7, 2017 02:20 PM2017-03-07T14:20:40+5:302017-03-07T14:20:40+5:30

३० महिला चित्रकारांनी एकत्रितपणे सादर केलेला चित्र व शिल्पाकृतींचा अनोखा आविष्कार मुंबईत बॉम्बे म्यूचुअल टेरेस बिल्डिंग मधील प्रसिद्ध डीडी नेरॉय आर्ट गॅलरीत पाहायला मिळणार आहे.

Wonderful art discovery of femininity, exhibition in Mumbai | स्त्रीशक्तीचा अनोखा कलाविष्कार, मुंबईत कलाप्रदर्शन

स्त्रीशक्तीचा अनोखा कलाविष्कार, मुंबईत कलाप्रदर्शन

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई व इतर राज्यातील नामवंत व गुणवान अशा ३० महिला चित्रकारांनी एकत्रितपणे सादर केलेला त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्र व शिल्पाकृतींचा अनोखा आविष्कार “एंपॉवरमेंट” हया शीर्षकांतर्गत मुंबईत ऑपेरा हाऊस येथील चौपाटीजवळ असलेल्या बॉम्बे म्यूचुअल टेरेस बिल्डिंग मधील प्रसिद्ध डीडी नेरॉय आर्ट गॅलरीत पाहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन दि. ८ ते १५ मार्च, २०१७ हया कालावधीत भरविण्यात येणार असून ११ ते ७ हया वेळेत रसिकांना पाहता येणार आहे. हया प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. उमा रेळे (प्रिन्सिपल, नालंदा नृत्यकला महाविद्यालय), डॉ. किशु पाल (भरतनाट्यम, कुचीपुडी विशारद), अभिनेत्री रश्मी पित्रे यांच्या शुभहस्ते होणार असून याप्रसंगी कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हया प्रदर्शनाचे आयोजन गायत्री देसाई यांनी केले असून सदर प्रदर्शनात महिला चित्रकारांनी साकारलेल्या कलाकृतींद्वारे रसिकांना स्त्री शक्तीचा अनोखा आविष्कार तसेच अनेक सांस्कृतिक विशेषांचे व अभिव्यक्तित्वांचे एक आगळे वेगळे दर्शन घडणार आहे.
 
 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई व विविध राज्यातील महिलांना एकत्रित आणून त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणे, हा यामागचा उद्देश आहे. मुळात प्रत्येक स्त्री मध्ये एक सुप्त शक्ति व संवेदनशील मन असते व त्याचे प्रकटीकरण एक कलात्मक आविष्काराच्या माध्यमातून करावयाचे ही तिची आंतरिक मनीषा असते. नेमका हा धागा पकडून आयोजक गायत्री देसाई यांनी भारतातील विविध प्रदेशातील भिन्न संस्कृती व कलात्मक अभिव्यक्ती असणार्‍या ३० महिला चित्रकारांना एकत्र आणून त्यांनी तयार केलेल्या चित्र व शिल्पाकृती हया प्रदर्शनात सादर केल्या आहेत.
 
 
“एंपॉवरमेंट” हया चित्रप्रदर्शनात अमीषा मेहता, अनघा देशपांडे, चेतना सुदामे, देबाजानी भट्टाचार्य, देवांगना छाब्रिया, दीपिका टोपीवाला, फिलोमिना पवार, जयश्री राव, खुशबू मदनानी, मंजुशा गांगुली, मनीषा वेदपाठक, नमिता कोलही, नेहा नागडा, रुकसाना तबस्सुम, प्रणाली हरपुडे, पुर्णिमा दाभोळकर, राधिका पोवार, रश्मी पित्रे, डॉ रुता इनामदार, सोनल गांधी, सोनम गुप्ता, सुक्रीती दत्त, सुमना नाथ डे, सुनीता फरकिया, सुरभी खन्ना, तेजश्री प्रधान, वरणीता सेठी, विम्मी मनोज, विनीता रूपाणी आणि झरणा दोशी हया ३० महिला चित्रकर्तींचा समावेश असून त्यांनी सादर केलेला हा सौंदर्यपूर्ण, बोलका व कलात्मक आविष्कार सर्वांना आवडेल असाच आहे.

Web Title: Wonderful art discovery of femininity, exhibition in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.