जोवर जावेद अख्तर माफी मागणार नाहीत, तोवर त्यांच्या चित्रपटांचं स्क्रिनिंग होऊ देणार नाही; भाजप आमदाराचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 11:08 PM2021-09-04T23:08:38+5:302021-09-04T23:09:22+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं.

wont allow screening of his films till javed akhtar apologizes bjp mla ram kadam | जोवर जावेद अख्तर माफी मागणार नाहीत, तोवर त्यांच्या चित्रपटांचं स्क्रिनिंग होऊ देणार नाही; भाजप आमदाराचा इशारा 

जोवर जावेद अख्तर माफी मागणार नाहीत, तोवर त्यांच्या चित्रपटांचं स्क्रिनिंग होऊ देणार नाही; भाजप आमदाराचा इशारा 

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं.

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच आहे," असं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं होतं. तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचं सांगत त्यांनी तालिबानवर टीकेची झोड उठवली. याचवेळी भारताचं तालिबान कधी होऊ शकत नाही, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. परंतु त्यांच्या वक्तव्यावरून आता रोष व्यक्त केला जात आहे. भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी जावेद अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

"जावेद अख्तर यांचं वक्तव्या हे केवळ दुर्दैवी नाही तर, संघ, विश्व हिंदू परिषदेच्या कोट्यवधी कार्यकर्ते आणि जगभरातील या विचारधारेला मानणारे कोट्यवधी लोकांचा अपमान आहे! जोपर्यंत जावेद अख्तर हाथ जोडून माफी मागत नाही तोपर्यंत त्याची, त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही चित्रपट या भूमित चालू देणार नाही," असं राम कदम म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत हा इशारा दिला आहे.


"संघटनांचे कार्यकर्ते गरीब व्यक्तींची सेवा करतात आणि यांनी त्यांचा अपमान केला आहे. हे वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी हा विचार केला पाहिजे होता की एकाच विचारधारेची लोकं आता सरकार चालवत आहेत. राजधर्म पूर्ण करत आहेत. जर तालिबानी विचारधारा असती तर त्यांना हे वक्तव्य करता आलं असतं का? यावरून त्यांचं वक्तव्य किती पोकळ आहे हे समजतं," असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते जावेद अख्तर ?
"ज्या पद्धतीनं तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसक आहेत. रानटी आहेत. पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत", असं जावेद अख्तर म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर वक्तव्य केलं होतं.

भारतातील मुस्लिमांचा एक लहान गट देखील तालिबानचं समर्थन करतोय हे दुर्दैवी असल्याचंही अख्तर म्हणाले. "तालिबान आणि त्यांच्यासारखं वागण्याची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक साम्य आहे. देशातील काही मुस्लिमांनीही अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यावर त्याचं स्वागत केलं. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. भारतातील मुस्लीम तरुण हे चांगलं जीवन, रोजगार, चांगलं शिक्षण या गोष्टींच्या मागे लागले आहेत. पण मुस्लिमांचा एक गट असा आहे की जो स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

Web Title: wont allow screening of his films till javed akhtar apologizes bjp mla ram kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.