स्वभावरेषा - शब्दांप्रमाणेच सहीसुद्धा करते संमोहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:41 PM2019-11-04T23:41:45+5:302019-11-04T23:42:04+5:30

सत्य साईबाबा, जादूगार पी.सी. सरकार, दलाई लामा, जे. कृष्णमूर्ती, ओशो, बाबा रामदेव यांच्या स्वाक्षºया बघितल्या तर अनेक गोष्टी जाणवतात.

Like words, signatures do the same | स्वभावरेषा - शब्दांप्रमाणेच सहीसुद्धा करते संमोहित

स्वभावरेषा - शब्दांप्रमाणेच सहीसुद्धा करते संमोहित

googlenewsNext

सतीश चाफेकर

समाजात असा एक वर्ग आहे तो म्हणजे साधू, साध्वी, आचार्य, बाबा, बापू आणि तत्सम मंडळी. यांची स्वाक्षरी, हस्ताक्षरे कशी असतील, त्यांच्या स्वाक्षऱ्या कशा असतील, याचे मला जाम कुतूहल होते. मी शंकराचार्य यांचे हस्ताक्षर स्वत: घेतले आहे. लोक यांच्या मागे फिरतात, असे त्या व्यक्तीत काय आहे, हे पाहण्याचा प्रयत्न करू. यांच्याविषयी बोलले तर काहींच्या भावना दुखावू शकतात. पण, इतकी माणसे त्यांच्या मागे लागतात, असा त्यांच्यात कोणता गुण आहे, इतका आत्मविश्वास त्यांच्यात कसा असतो, हे एक न सुटणारं कोडं आहे. यापूर्वी अनेक जादूगारांच्या स्वाक्षºया बघितल्या आहेत. इतका भन्नाट आत्मविश्वास यांच्याकडे येतो कसा, कशी ते त्यांच्या अस्तित्वाची यशस्वी मांडणी करतात, हे समजून घेऊ.

सत्य साईबाबा, जादूगार पी.सी. सरकार, दलाई लामा, जे. कृष्णमूर्ती, ओशो, बाबा रामदेव यांच्या स्वाक्षºया बघितल्या तर अनेक गोष्टी जाणवतात. दुर्दैवाने काही जणांच्या स्वाक्षºया उपलब्ध नाही. या सर्व स्वाक्षºया बघताना खूप काही वेगळे जाणवते. प्रत्येक कालखंडात अशा प्रकारची माणसं हमखास दिसतात. इतकंच नव्हे तर त्यांचा सामान्य व्यक्तींवर प्रभाव दिसतो. या स्वाक्षऱ्यांमध्ये जे. कृष्णमूर्ती यांची स्वाक्षरी आहे, ती साधी आणि पटकन समजते, वाचता येते, तर सर्वात दुर्बोध स्वाक्षरी आहे ओशो यांची. तर सगळ्यात ओघवती स्वाक्षरी आहे दलाई लामा यांची.
सत्य साईबाबा, रामदेव बाबा यांच्या स्वाक्षºया ओशोपेक्षा कमी कॉम्प्लिकेटेड आहेत. नीट विचार केला तर या सर्व मंडळींनी त्यात्या काळात सर्वांवर आधिपत्य गाजवले आहे. मग ते सामान्य माणसावर असो किंवा बड्या राजकारणी व्यक्तीपासून छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत असो. परंतु ज्यांचे तत्त्वज्ञान किंवा बंडखोरी आजही चर्चित आहे, ते म्हणजे ओशो आणि जे. कृष्णमूर्ती.
तर पी.सी. सरकार आणि सत्य साईबाबा यांची भेट अनेकांना आठवत असेल. पी.सी. सरकार हे जादूगार होते आणि ही मंडळी पण एक प्रकारे जादूगारच होती, असे म्हटले तर? कारण हजारो लोकांना संमोहित करणे हे काही सोपे काम नसते. प्रत्येक जण बुद्धीचा वापर करतो, पण वेगवेगळ्या प्रकारे.

ओशो आणि जे. कृष्णमूर्ती नीट पाहिले तर दोघांचाही प्रवास एका अंतिम मुक्ततेकडे होता. परंतु दोघांच्या स्वाक्षºयांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक. वागणुकीत, वर्तुणकीतही परंतु विरक्तता एकच. जे. कृष्णमूर्तींना जेव्हा कॅन्सर झाला होता, तेव्हा ते अमेरिकेत निघाले होते. त्यांना एकाने प्रश्न विचारला आपण मृत्यूवर अनेक वेळा बोलला आहात, आता तुम्ही मृत्यूच्या जवळ जात आहात का, काय सांगाल? त्यावर ते म्हणाले, ‘काही दिवस या प्लॅनेटवर राहिलो, आता दुसरीकडे जात आहे.’
तिकडे ओशोंचे निधन झाले. एखाद्या पणतीच्या दिव्यातील तेल संपत जाऊन, शेवटचा थेंब संपला की, जशी ज्योत शांत होते, विझते तसा त्यांचा शेवट झाला. त्यांची शेवटची वाक्ये अत्यंत विचार करावयास लावतात. त्यांच्या त्या समाधीच्या जागेवर वाक्ये लिहिण्यात आली होती, या प्लॅनेटवर मी अमुक तारखेपासून तमुक तारखेपर्यंत राहत होतो. हे साम्य होते ओशो आणि जे. कृष्णमूर्ती यांच्यामध्ये. खरेतर दोघांचे विचार आचरणात आणायला कठीण आहेत. त्यामुळे आपली भूमिका ही थिंकरची असली पाहिजे, फॉलोअरची नसावी, असे माझे स्पष्ट मत आहे.

कोणताही कालखंड पाहिला तरी त्यात ठरावीक प्रकारच्या लोकांचा प्रभाव सर्वांवरच दिसून येतो. ती माणसं म्हणजे साधू, आचार्य, बाबा, बापू आणि तत्सम मंडळी. अनेक जण त्यांना गुरूस्थानी मानतात. त्यांच्या विचारांचे अनुकरण करतात. पण सामान्यांपासून ते अगदी बड्या नेते, उद्योजक मंडळींपर्यंत सारेच यांच्यामागे लागतात. लोकांना संमोहित करण्याची ताकद यांच्यात असते. त्यांचे सादरीकरण उत्तम असते आणि या गोष्टी त्यांच्या सहीतूनही स्पष्ट होत असतात.

सत्य साईबाबा यांच्याकडे जबरदस्त प्रेझेंटेशन होते, हे त्यांच्या स्वाक्षरीवरून जाणवते. त्यांच्या स्वाक्षरीचे कर्व्हज बरंच काही सांगतात. तर, दुसरीकडे पी.सी. सरकार यांची लांबलचक स्वाक्षरी त्यांच्या कामाचा स्पॅन आणि वारंवार येणारी आव्हाने सांगतात. अत्यंत सरळ तत्त्वज्ञान सांगणारे ओशो मात्र अत्यंत वेगळी स्वाक्षरी करत, कारण ते आचार्य रजनीश या नावानंतर त्यांनी ओशो हे नाव धारण करून तशी स्वाक्षरी करणे सुरू केले. ओशोंचे खरे नाव होते रजनीश मोहन चंद्रा. त्यांची स्वाक्षरी म्हणजे आर्टचा नमुना आहे. ते म्हणत मी आर्टिस्ट नाही तर आर्ट आहे. त्यांच्या वेगवेगळ्या सालातील स्वाक्षºया या वेगवेगळ्या आहेत, पण त्या आर्टच्या धाटणीच्याच आहे.



 

Web Title: Like words, signatures do the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.