नेरळ स्थानकातील पुलाचे काम संथ गतीने

By admin | Published: March 3, 2017 03:04 AM2017-03-03T03:04:45+5:302017-03-03T03:04:45+5:30

रेल्वे प्रशासनाने याच नेरळ स्थानकात मागील चार महिन्यांपासून नव्याने पादचारी पुलाचे काम सुरू केले आहे

The work of the bridge in the Kerala station is slow | नेरळ स्थानकातील पुलाचे काम संथ गतीने

नेरळ स्थानकातील पुलाचे काम संथ गतीने

Next


नेरळ : मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकात अनेक वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पादचारी पुलाचे काम रखडले असताना, रेल्वे प्रशासनाने याच नेरळ स्थानकात मागील चार महिन्यांपासून नव्याने पादचारी पुलाचे काम सुरू केले आहे. १८ फूट रुंदीचा हा नवीन पादचारी पूल करण्यात येणार असून या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. हा पूल तयार झाल्याने, स्थानकातील जुना पूल त्यानंतर तोडला जाणार आहे; परंतु एक पादचारी पूल नेरळ स्थानकात अर्धवट अवस्थेत उभा असून त्याबाबत रेल्वे प्रशासन जाहीर भूमिका घेत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या अर्धवट पुलाचे कामही सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
माथेरान या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी नेरळ- माथेरान मिनीट्रेन चालविली जात आहे. त्यामुळे महत्त्वाचे जंक्शन स्थानक असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने चांगली पावले उचलली आहेत. २००३मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांनी नेरळ स्थानकात पादचारी पूल बांधण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर नेरळ स्थानकात मुंबई एन्डकडे पादचारी पुलाची उभारणी करण्यास सुरु वात झाली. मात्र, पुलाचे काम अर्धवट झाल्यानंतर काही काळ पुलाचे काम बंद पडले होते. त्यानंतर ठेकेदार आणि रेल्वे यांच्यात झालेला वाद हा न्यायालयात प्रलंबित असल्याने गेली अनेक वर्षे पादचारी पुलाचे काम बंद आहे. नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने सातत्याने मागणी केल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने अखेर नेरळ स्थानकात नवीन पादचारी पूल मंजूर केला. मध्य रेल्वे व्यवस्थापकांच्या नेरळ भेटीच्या अनेक तारखा मागील चार महिने जाहीर होत होत्या. त्यामुळे नोव्हेंबर २०१६मध्ये पादचारी पुलाच्या प्रत्यक्ष कामाला
सुरु वात झाली.
आता पुलाचे नेरळ स्थानकातील पायाचे बांधकाम पूर्ण झाले असून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मे २०१७ ही डेडलाइन देण्यात आली आहे. पुलावर गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाला मेगा ब्लॉकदेखील घ्यावा लागणार आहे. मात्र, नवीन पादचारी पुलामुळे नेरळ रेल्वे स्थानकात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्या नेरळ रेल्वे स्थानकात असलेला ९० वर्षांपूर्वीचा पादचारी पूल हा ९ फूट रु ंदीचा असून नवीन पुलाची रु ंदी ही १८ फूट म्हणजे ६ मीटर एवढी आहे. त्याचवेळी पुलावर चढताना प्रवाशांना अधिक जागा मिळणार असून हा पूल मे महिन्यात खुला झाल्यानंतर नेरळ स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यात येणार आहे; परंतु मुंबई एन्डकडील अर्धवट अवस्थेतील पादचारी पूल कधी पूर्ण होणार? असा प्रश्न प्रवाशांना पडला असून अर्धवट अवस्थेत असलेला पादचारी पूल पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
>नेरळ स्थानकात होणारा नवीन पूल जास्त रु ंदीचा होणार आहे. मात्र, त्याची उंची सध्या असलेल्या जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा अधिक असल्याने चढ-उतार करताना प्रवाशांना त्रासदायक ठरणार आहे. नेरळ स्थानकातील अर्धवट अवस्थेत असलेला पूल पूर्ण केल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकेल. यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावे.
- संदीप म्हसकर, अध्यक्ष, प्रवासी संघटना
>नेरळ रेल्वे स्थानकात सुरू करण्यात आलेल्या नवीन होणाऱ्या पादचारी पुलास एका बाजूने बदलापूर-ठाणे सारखी स्वयंचलित यंत्रणा बसविली तर प्रवाशंना जिना चढताना त्रास होणार नाही. जिना उतरण्यासाठी प्रवासी पायऱ्यांचा वापर करतील. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने विचार करावा, अशी मागणीदेखील प्रवाशांकडून केली जात आहे.
सध्या नेरळ रेल्वे स्थानकात ९० वर्षांपूर्वीचा पादचारी पूल हा ९ फूट रु ंदीचा असून नवीन पुलाची रु ंदी ही १८ फूट म्हणजे ६ मीटर एवढी आहे. त्याच वेळी पुलावर चढताना प्रवाशांना अधिक जागा मिळणार असून हा पूल मे महिन्यात खुला झाल्यानंतर नेरळ स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यात येणार आहे; परंतु मुंबई एन्डकडील अर्धवट अवस्थेतील पादचारी पूल कधी पूर्ण होणार? असा प्रवाशांचा प्रश्न आहे.

Web Title: The work of the bridge in the Kerala station is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.