‘व्हॉट्सअ‍ॅप’वर चालणार उदंचन केंद्रांचे काम

By admin | Published: July 1, 2017 03:16 AM2017-07-01T03:16:35+5:302017-07-01T03:16:35+5:30

उदंचन केंद्रांच्या कार्यवाहीचे समन्वयन व संनियंत्रण करणे सुलभ होण्यासह अधिकाऱ्यांना परस्पर संपर्क साधणे सुकर व्हावे,

Work of centers of excavation at WHATSAP | ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर चालणार उदंचन केंद्रांचे काम

‘व्हॉट्सअ‍ॅप’वर चालणार उदंचन केंद्रांचे काम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उदंचन केंद्रांच्या कार्यवाहीचे समन्वयन व संनियंत्रण करणे सुलभ होण्यासह अधिकाऱ्यांना परस्पर संपर्क साधणे सुकर व्हावे, यासाठी ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुप सुरू करण्यात आला आहे. या ग्रुपचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, यामुळे
पंप योग्यवेळी सुरू होण्यासोबतच पंप सुरू ठेवण्यासाठी आवश्यक डिझेलसाठाही वेळोवेळी उपलब्ध होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या पर्जन्यजल वाहिन्या या खात्याचे संबंधित उपप्रमुख अभियंता पी. पी. खेडकर यांनी यासंदर्भात सांगितले की, समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या मुंबईची भौगोलिक रचना लक्षात घेता पावसाळ्यादरम्यान भरतीच्या कालावधीत पावसाचा वेग अधिक असल्यास सखल भागांमध्ये पाणी साचू शकते. या साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी महापालिका क्षेत्रात ६ ठिकाणी उदंचन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या उदंचन केंद्रांची एकत्रित पाणीउपसा क्षमता ही दर सेकंदाला तब्बल २ लाख ३४ हजार लीटर आहे.
पंपिंग स्टेशन संबंधित प्रभावी समन्वयन व संनियंत्रण करता यावे यासाठी संबंधित परिमंडळांचे ४ उपायुक्त, संबंधित ८ विभागांचे सहायक आयुक्त, प्रमुख अभियंता (पर्जन्यजल वाहिन्या), उपप्रमुख अभियंता, पंपिंग स्टेशनशी संबंधित २ कार्यकारी व ४ सहायक अभियंते यांच्यासह पंपिंग स्टेशनशी संबंधित कंत्राटदारांचे वरिष्ठ तांत्रिक प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सुरू करण्यात आला आहे.
सर्व ६ पंपिंग स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या पंपिंग स्टेशनशी संबंधित आवश्यक ती सर्व माहिती नियमितपणे या ग्रुपवर टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Work of centers of excavation at WHATSAP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.