भिवंडीत सफाई कामगारांचा संप

By admin | Published: November 2, 2016 03:39 AM2016-11-02T03:39:15+5:302016-11-02T03:39:15+5:30

ऐन दिवाळीत शहरातील कचरा कंत्राटदारांनी उचलला नाही. तर पालिका कामगारांनी आंदोलन पुकारत नागरिकांना वेठीस धरले आहे

Work of clean sweep workers | भिवंडीत सफाई कामगारांचा संप

भिवंडीत सफाई कामगारांचा संप

Next


भिवंडी : ऐन दिवाळीत शहरातील कचरा कंत्राटदारांनी उचलला नाही. तर पालिका कामगारांनी आंदोलन पुकारत नागरिकांना वेठीस धरले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. या प्रकरणी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
दिवाळीसाठी आॅक्टोबरचा पगार लवकर मिळावा तसेच दरवर्षीप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळावे अशी महापालिकेतील सर्व कर्मचारी संघटनेची मागणी होती. परंतु काही नगरसेवकांनी महासभेत कर्मचारी काम करीत नाही,असा आरोप करीत कामगारांना दुषणे दिली. त्यामुळे कामगारांनी आंदोलन पुकारले. महापालिकेची आर्थिक स्थिती संकटात असल्याने कामगारांच्या मागण्या पूर्ण करता येणार नाही,
असा पवित्रा आयुक्तांनी
घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
महापौर तुषार चौधरी यांनी ९५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे सांगत कामगारांची सहानभूती मिळविली. परंतु ते आपला शब्द पूर्ण करू न शकल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
>नागरिक दुर्गंधीने त्रस्त
या सर्व घटनांमुळे कामगारांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सफाई कामगारांचा संप तसेच कंत्राटदारांनी दोन दिवसांपासून कंत्राटदारांनी कचरा कुंडीतून उचलला नसल्याने तो रस्त्यावर आला आहे. तसेच कुजलेल्या कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे.

Web Title: Work of clean sweep workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.