कष्ट करा, यशाच्या आड जात, धर्म येणार नाही!

By admin | Published: June 23, 2017 01:45 AM2017-06-23T01:45:26+5:302017-06-23T01:45:26+5:30

मी कोर्टात चपराशी होतो. कष्ट केले, कर्तृत्व दाखविले अन् मोठा झालो. आपण सर्वांनीच जर निवडलेल्या क्षेत्रात कष्ट घेतले तर तुम्ही कोणत्याही जाती-धर्माचे असा

Work is going to be overcome, success will not come! | कष्ट करा, यशाच्या आड जात, धर्म येणार नाही!

कष्ट करा, यशाच्या आड जात, धर्म येणार नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : मी कोर्टात चपराशी होतो. कष्ट केले, कर्तृत्व दाखविले अन् मोठा झालो. आपण सर्वांनीच जर निवडलेल्या क्षेत्रात कष्ट घेतले तर तुम्ही कोणत्याही जाती-धर्माचे असा; ते तुमच्या आड येणार नाही. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या ‘आयकॉन्स आॅफ सोलापूर-२’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते शानदार समारंभात झाले, त्यावेळी ते बोलत होते. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भारत विकास ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महापौर शोभा बनशेट्टी,‘एआरपीआय’ ग्रुप आॅफ कंपनीजच्या प्रमुख इंदुमती अलगोंड मंचावर होते.
शिंदे म्हणाले, ‘लोकमत’चे हे कॉफी टेबल बुक युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यामधील सर्वच आयकॉन्सनी विविध क्षेत्रात यश मिळविलेले आहे. त्यांनी केलेल्या परिश्रमामुळेच ते यशाचे मानकरी ठरले आहेत. त्यामुळे प्रत्येकानेच कष्ट करून हिमतीने पुढे आले पाहिजे. ‘बीव्हीजी’ ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांच्या कार्याचाही शिंदे यांनी गौरव केला.
गायकवाड म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेतून भारत विकास ग्रुपचे काम सुरू आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी स्वामीजींना १०० युवक हवे होते. त्यातील मी एक आहे, असे स्वत:ला समजतो.
राजेंद्र दर्डा यांनी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचे स्मरण आणि चार हुतात्म्यांच्या कार्याचा गौरव करून भाषणाला सुरुवात केली. सोलापूर ही गुणवंतांची खाण आहे. पारंपरिक वाटा धुडकावून वेगळ्या क्षेत्रात प्रवेश करणारे अनेक उद्यमशील उद्योजक सोलापूरकर आहेत. येत्या काही वर्षात सोलापूर हे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून उदयास येत आहे; पण या शहराचे काही प्रश्न आहेत. ‘लोकमत’ अनेकवेळा हे प्रश्न मांडून सोलापूरकरांना मंच उपलब्ध करून दिला आहे; पण याबरोबरच विकासासाठी झटून यश संपादन करणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने आयकॉन असणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणेही गरजेचे असते. हे आयकॉन्स युवकांना सदैव प्रेरणादायी असतात. त्यांची यशोगाथा मांडण्यासाठीच ‘आयकॉन्स आॅफ सोलापूर’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात येत आहे, असे दर्डा यांनी सांगितले. पालकमंत्री देशमुख यांनी ‘लोकमत’च्या आयकॉन्स आॅफ सोलापूरमध्ये प्रेरणादायी व्यक्तींची वाटचाल मांडली आहे, असे सांगितले .

‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले की, कोणतेही काम छोटे नसते; पण ते मनापासून केले पाहिजे. मीही टेलिफोन आॅपरेटरचे काम केले. रेस्टॉरंटमध्ये काम केले. लंडनमध्ये हे करताना शिक्षणात सुवर्णपदक मिळवून भारतात आलो.
यवतमाळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून ‘जे. जे. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे शिष्यवृत्ती मिळवून लंडनला शिकायला गेलो. आपले सुशीलकुमार शिंदे हेही स्वत:च्या पायावर उभे राहून मोठे झाले. त्यांनीही जीवनात चपराशासारखी छोटी कामे केली आणि आपल्या कर्तृत्वाने मोठे झाले, असेही दर्डा म्हणाले.

‘लोकमत’ माझा पेपर!
सुशीलकुमार शिंदे यांनी स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्याशी राहिलेल्या स्नेहपूर्ण संबंधाचा उल्लेख करून ‘लोकमत’ हा माझा पेपर असल्याचे सांगितले. स्व. जवाहरलालजी दर्डा आमदार असताना ते हाऊसिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे मी दलितांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी कर्ज मागायला गेलो होतो. त्यांनी ते तत्काळ मंजूर केल्याची आठवण शिंदे यांनी सांगितली.

Web Title: Work is going to be overcome, success will not come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.