कार्यकत्र्याचे जेवण 90 की 45 रुपयांत भागणार

By admin | Published: September 20, 2014 11:37 PM2014-09-20T23:37:54+5:302014-09-20T23:37:54+5:30

प्रचारादरम्यान कार्यकत्र्याची भूक भागविण्यासाठीचा नाष्टय़ासाठी (वर्किग लंच) 9क् रुपये खर्च येतो, की 45 रुपयांतच भागू शकते,

Work lunch will cost 90 rupees to 45 rupees | कार्यकत्र्याचे जेवण 90 की 45 रुपयांत भागणार

कार्यकत्र्याचे जेवण 90 की 45 रुपयांत भागणार

Next
पुणो : प्रचारादरम्यान कार्यकत्र्याची भूक भागविण्यासाठीचा नाष्टय़ासाठी (वर्किग लंच) 9क् रुपये खर्च येतो, की 45 रुपयांतच भागू शकते, यावरून आज निवडणूक प्रशासन आणि राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी झाली.  प्रशासना कडून निवडणूकविषयक सर्वच बाबींसाठी ठरवून देण्यात आलेला खर्च अवाच्या सवा असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला. राजकीय पक्षांनी सुचविलेले दर आणि बाजारातील दर यांची तपासणी करून अंतिम दर दोन दिवसांत जाहीर केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 
विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून केल्या जाणा:या खर्चाच्या रकमेची बिले निश्चित करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून बैठक बोलाविण्यात आली होती. 
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक आयोगाने 28 लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा घालून दिलेली आहे. त्यात मंडप, बॅनर्स, कार्यकर्ते जेवण, नाष्टा, प्रचार साहित्य, प्रचारसाठी वापरली जाणारी वाहने अशा तब्बल 69 घटकांची बिले शासकीय दरानुसार किती असतील, याची चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांच्या पदाधिका:यांची बैठक आज दुपारी कौन्सिल हॉल येथे बोलाविण्यात आली होती. या वेळी प्रशासनाकडून 
या वस्तूंचे ई-टेंडरिंगद्वारे मागविण्यात आलेली दर सूची पदाधिका:यांना देण्यात आली. मात्र, हे दर बाजारातील दरापेक्षा कितीतरी अधिक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यास जोरदार विरोध केला. त्यावरून पदाधिकारी आणि अधिका:यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निवडणूक कार्यालयाकडून सुचविण्यात आलेले दर आवाजवी आहेत. प्रत्यक्षात बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात वस्तूंची खरेदी केल्याने हे दर आणखी 
कमी होतात. त्यामुळे प्रशासनाने राजकीय पक्षांनी सुचविलेल्या दरांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केली आहे. 
राजकीय पक्षांनी सांगितलेले दर आणि प्रशासनाने दिलेले दर, यामध्ये खूप फरक असल्याचे जाणवल्यावर कार्यकर्ते व पदाधिका:यांनी जोरदार आक्षेप घेऊन, हा निर्णय तातडीने बदलण्याची मागणी केली.
त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, बाजारातील दराची तुलना करून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे 
सांगितल्याने तणाव निवळला.
                                (प्रतिनिधी)
 
4बाजारातील दर आणि या ठिकाणी दाखविलेले दर यात तफावत असल्याची चर्चा सुरू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रामुख्याने चहापान, जेवण; तसेच प्रचारासाठी वापरल्या जाणा:या वस्तूंचे दर हे जास्त असल्याचे आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे या वस्तूंचे हे दर जादा असल्याने अवघ्या काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीचेच दर कायम ठेवावते, अशी मागणी पदाधिका:यांनी केली. या वेळी या वादावर तोडगा काढत पक्षांनी सुचविलेले दर प्रशासनाकडून लिहून घेण्यात आले आहेत. हे दर आणि बाजारीत दरांची तुलना करून, अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत घेण्यात येणार आहे.
 
ई-टेंडरिंगनुसार, जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून निवडणूक प्रचारात वापरल्या जाणा:या वस्तूंच्या किमती ठरविण्यात आल्या आहेत. त्याची माहिती राजकीय पक्षांना आज देण्यात आली असून, त्यावर त्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. त्यानुसार, राजकीय पक्षांनी सुचविले दर आणि बाजारातील दर यांची तपासणी करूनच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच, त्याची माहिती पक्षांना कळविली जाईल.
- प्रदीप पाटील, 
अप्पर जिल्हाधिकारी. 
 
फर्निचर व मंडप व्यवस्था 
वस्तू                         प्रशासन दरराजकीय पक्षांनी 
सुचविले दर 
कापडी मंडप (पत्रशेडसह)225   15क्
कापडी मंडप (साधा)         72       35
पत्र शेड                          18क्          1क्क्
फोल्डिंग टेबल  (4 बाय 2) 4क्             1क्
फोल्डिंग टेबल ( फ्रीलसह)  6क्             12
फायबर खुर्ची                   7.2क्          3
बांबू रेलिंग (3 फूट )          13             5
कापडी सतरंजी (9 बाय 12)45             1क्
लाकडी स्टेज   दोन फूट      25क्           1क्क्
टी-पॉय                          234           12
मोबाईल टॉयलेट              15क्क्         7क्क्
उशी                               12             5
जनरेटर                           1क्क्क्क्      8क्क्क्
फ्ल्ड लाईट                      18क्           6क्
 
चहापान व भोजन दर
वर्किंग लंच 
(पुरी, पराठे /दोन भाज्या)9क् 45
विदउट स्विट 
विथ स्विट1क्545
फूड पँकेट 6क्25
 

 

Web Title: Work lunch will cost 90 rupees to 45 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.