जलसंधारण खात्यात दाेन शिफ्टमध्ये काम, जलसंधारण मंत्री गडाख यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 03:43 AM2021-03-14T03:43:04+5:302021-03-14T03:44:03+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासकीय कार्यालयांत दोन शिफ्टमध्ये काम करण्यासंबंधी अलीकडेच सूतोवाच केले होते.
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंत्रालयातील विविध शासकीय विभागांनी दोन शिफ्टमध्ये काम करण्यासाठीचे नियोजन सुरू केले आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तसे आदेश दिले आहेत. जलसंधारण विभागात १५ मार्चपासून दोन शिफ्टमध्ये काम सुरू होत आहे. (Work in two shift in Water Conservation Department, instructions to the officials of Water Conservation Minister Gadakh)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासकीय कार्यालयांत दोन शिफ्टमध्ये काम करण्यासंबंधी अलीकडेच सूतोवाच केले होते. त्यानुसार जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व सोमवारपासून त्याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ आणि दुपारी १२ ते रात्री ८ अशा दोन शिफ्टच्या कार्यालयीन वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. जे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात जितका वेळ उशिराने उपस्थित होतील तितका वेळ उशिरापर्यंत थांबून काम करतील.