२०० वाहनांतून कार्यकर्ते भगवानगडावर धडकणार

By Admin | Published: October 7, 2016 05:30 AM2016-10-07T05:30:24+5:302016-10-07T05:30:24+5:30

पोहरादेवी येथील भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी केले

Workers from 200 vehicles will be hit on Bhagwan Bhagwad | २०० वाहनांतून कार्यकर्ते भगवानगडावर धडकणार

२०० वाहनांतून कार्यकर्ते भगवानगडावर धडकणार

googlenewsNext

मुंबई : पोहरादेवी येथील भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी केले. त्याला साद देत, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातून २०० चारचाकी वाहने भरून कार्यकर्ते भगवानगडावर धडकतील, अशी घोषणा भटके-विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबासे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, कार्यकर्ते थेट भगवानगडावर धडकणार आहे. २०० वाहनांचे नियोजन परिषदेने मुंबई महानगर क्षेत्रातून केले आहे. समाजाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर समाजाकडे खंबीर नेतृत्व नाही. बहुजन समाजाची चळवळ पेटवण्याचे काम मुंडे यांनी केले होते. त्यांच्या पश्चात पंकजा यांच्या रूपात समाजाला नेतृत्व मिळत आहे. मात्र, त्याला विरोध करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थिती त्यांच्या पाठिशी उभी राहून परिषद एका नव्या नेतृत्वाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Workers from 200 vehicles will be hit on Bhagwan Bhagwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.