एसटी वर्कशॉपमधील कष्टकरी हिरकणी

By Admin | Published: May 4, 2015 01:33 AM2015-05-04T01:33:56+5:302015-05-04T01:33:56+5:30

कुणी आयटीआय करून डी़एड़ केलंय तर कुणी कृषी पदविका, कुणी पदवी घेत आहे. मात्र कामाची लाज न बाळगता येथील एसटी वर्कशॉपमध्ये सहा हिरकणी

Workers' Hurricane at the ST Workshop | एसटी वर्कशॉपमधील कष्टकरी हिरकणी

एसटी वर्कशॉपमधील कष्टकरी हिरकणी

googlenewsNext

शिवाजी सुरवसे, सोलापूर
कुणी आयटीआय करून डी़एड़ केलंय तर कुणी कृषी पदविका, कुणी पदवी घेत आहे. मात्र कामाची लाज न बाळगता येथील एसटी वर्कशॉपमध्ये सहा हिरकणी पुरुषांच्या बरोबरीने मेकॅनिकची कामे करीत आहेत.
मंदाकिनी सलगर, वंदना निंबर्गीकर, भारती वाघमारे, सविता पुजारी, वंदना कांबळे, अनिता माने सोलापूर बस डेपोमधील वर्कशॉपमध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत़ सहा महिन्यांपूर्वी त्या रुजू झाल्या़ मात्र पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने त्या एसटी दुरुस्तीची सर्व कामे कुशलतेने करीत आहेत.
मंदाकिनी सलगरने आयटीआयनंतर कृषी पदविका घेतली आहे. वंदना कांबळे यांचे डी़एड़ झाले आहे़ वंदना निंबर्गीकर पदवीधर आहेत. भारती वाघमारे कला शाखेचे शिक्षण घेत आहे. सविता पुजारीने बी़ए़ पूर्ण केलंय़ अनिता माने हिने आयटीआयनंतर बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

Web Title: Workers' Hurricane at the ST Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.