कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे- नारायण राणे
By admin | Published: September 25, 2016 10:59 PM2016-09-25T22:59:03+5:302016-09-25T22:59:03+5:30
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलं
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 25 - काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. चिपी विमानतळ अजून पूर्ण झालं नाही, राजकारण करून भाजप रेडी बंदरही रद्द करायला निघालं आहे. जिल्ह्यातील तरुण बेरोजगार असतानाही उद्योगधंदे बंद करण्याची प्रयत्न होत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. ते सावंतवाडी तालुक काँग्रेस कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते. मुंबई महामार्गावरून जाताना होडीतून प्रवास केल्यासारखे वाटते. केसरकर हे गोव्याचे की सिंधुदुर्गाचे, हेच कळत नाही. गृहराज्यमंत्री असताना २०० हून अधिक दिवस जमावबंदी लादली जाते, असं म्हणत राणेंनी केसरकरांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने मराठा आरक्षण जाहीर केले. मात्र युती सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही, अशीही राणेंनी टीका केली. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले तर कॉँग्रेसला कोणीही हरवू शकत नाही, असेही राणे म्हणाले आहेत.