कामचुकार अधिका-यांना घरी पाठविणार
By admin | Published: October 31, 2016 10:30 PM2016-10-31T22:30:38+5:302016-10-31T22:30:38+5:30
राज्याच्या विकासात विविध विभागांच्या अधिका-यांचा मौलिक वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य वेगाने समोर जात आहे. मात्र काही अधिकारी कामचुकार असून त्यांच्यात सुधारणा व्हायला वेळ लागतो आहे.
Next
id="yui_3_16_0_ym19_1_1477930681217_9819">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 31 - राज्याच्या विकासात विविध विभागांच्या अधिका-यांचा मौलिक वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य वेगाने समोर जात आहे. मात्र काही अधिकारी कामचुकार असून त्यांच्यात सुधारणा व्हायला वेळ लागतो आहे. अशा कामचुकार अधिका-यांना घरी पाठविण्यात येईल, या शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी कामात हलगर्जीपणा करणाºया अधिका-यांना इशारा दिला आहे. नागपूर येथे त्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ येथे पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
राज्य चालवत असताना अधिका-यांचे सहकार्य हा महत्त्वाचा भाग असतो. मागे माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला होता व अधिकारी माझे ऐकतच नाही असा अपप्रचार झाला होता. मुळात २ वर्षांच्या कार्यकाळात सरकारने राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक पावले उचलली आहे. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात राज्य तिस-या क्रमांकावर आले आहे. विद्यापीठांच्या प्रगतीला चालना देणाºया नवीन विद्यापीठ कायद्यासंदर्भातदेखील वेगाने कार्यवाही सुरू आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या चिकित्सा समितीचे जवळपास सर्वच मुद्द्यांवर एकमत झाले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात हा कायदा नक्की मंजूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईत लोकल सेवांना अधिक वेगवान करण्यात येणार असून ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ करण्यात येईल. यामुळे दुप्पट प्रवासी सहज प्रवास करु शकतील, असे त्यांनी सांगितले.