शेतीला जागतिक बँकेचे सहाय्य

By admin | Published: August 12, 2016 04:33 AM2016-08-12T04:33:51+5:302016-08-12T04:33:51+5:30

विदर्भ, मराठवाड्यातील चार हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पूर्णा खोऱ्यामधील खारपाण (क्षारयुवक्त) पट्टयातील सुमारे ९०० गावांमध्ये जागतिक

World Bank Assistance in Agriculture | शेतीला जागतिक बँकेचे सहाय्य

शेतीला जागतिक बँकेचे सहाय्य

Next

मुंबई : विदर्भ, मराठवाड्यातील चार हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पूर्णा खोऱ्यामधील खारपाण (क्षारयुवक्त) पट्टयातील सुमारे ९०० गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली.
हवामानातील लक्षणीय बदलांमुळे राज्यात दुष्काळ, तीव्र पाणीटंचाई आणि अतिवृष्टी यासारखी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे कृषी उत्पादन व उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात घट होऊन कृषी विकासाचा दर लक्षणीयरित्या घटू शकतो. या नैसिर्गक आव्हानाला सामोरे जाण्याबरोबरच कृषी क्षेत्र शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी हवामान बदलानुकूल असा कृषी क्षेत्राचा विकास करणारा हा प्रकल्प असेल. कृषी विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने असे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
हवामान अनुकूल कृषी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल, प्रकल्प अंमलबजावणीचा कृती आराखडा आणि विविध कार्यप्रणाली पुस्तिका तयार करण्यात येणार
आहे.प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई येथे प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यासह त्यासाठी आवश्यक २३ पदांच्या निर्मितीस मान्यता
देण्यात आली. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून ४ हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
खासगी आयुर्वेद-युनानी महाविद्यालयांत पेन्शन
शासन अनुदानित खासगी १६ आयुर्वेद आणि ३ युनानी १९ महाविद्यालयांसह एका संलग्न रुग्णालयामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व उपदान देण्याचा निर्णयही
झाला. कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयात निश्चित केलेल्या दिनांकापूर्वीचे प्रत्यक्ष निवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत.
प्रत्येक जिल्ह्यात खनिज प्रतिष्ठान
खाणबाधित क्षेत्र आणि नागरिकांचा विकास करण्यासाठी बृह्नमुंबई वगळून प्रत्येक जिल्ह्यात खनिज प्रतिष्ठानची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रतिष्ठानचा कक्ष राहणार आहे. हे प्रतिष्ठान एक विश्वस्त संस्था
म्हणून ना नफा - ना तोटा तत्त्वावर कार्य करणार आहे. पालकमंत्री प्रतिष्ठानचे पदसिद्ध अध्यक्ष तर प्राधान्याने खाण बाधित क्षेत्रातील विधानसभा - विधानपरिषद सदस्यांपैकी ३ सदस्य पदसिद्ध सदस्य असणार आहेत.
रास्तभाव दुकानदारांच्या रिबेटमध्ये ७३ टक्के वाढ
राज्यातील शिधावाटप दुकानदारांच्या वाहतूक रिबेटमध्ये प्रति क्विंटल ७३ टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला. २००५ नंतर
प्रथमच अशी वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील रास्तभाव दुकानदारांना तीन प्रकारानुसार वाहतूक रिबेट
दिले जात असून त्यात ७३ टक्के वाढ होणार आहे. नव्या दरानुसार मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र व पुणे, नागपूर, सोलापूर महानगरपालिका
क्षेत्रासाठी (अंतर विचारात न घेता) ८.४३ रु पयांऐवजी १४.५८ रुपये, उर्वरित महाराष्ट्रात गोदामापासून २० किलोमीटर अंतरापर्यंत ९.५६ ऐवजी १६.५३ रु पये तर गोदामापासून २० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असल्यास ११.२४ ऐवजी
१९.४४ रूपये रिबेट प्रति क्विंटलनुसार मंजूर करण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: World Bank Assistance in Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.