World Beard Day : दाढी असलेल्या मुलांबद्दल मुलींची मजेशीर निरीक्षणं 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 03:35 PM2018-09-01T15:35:00+5:302018-09-01T15:35:19+5:30

इतरवेळी नाही पण उत्सवांच्या काळात म्हणजे गणपती, दिवाळीत कुडता आणि दाढी वाढलेली मुलं बघायला जास्त भारी वाटतात.

World Beard Day: observation of girls about the bearded boys | World Beard Day : दाढी असलेल्या मुलांबद्दल मुलींची मजेशीर निरीक्षणं 

World Beard Day : दाढी असलेल्या मुलांबद्दल मुलींची मजेशीर निरीक्षणं 

googlenewsNext

पुणे : अगदी मुलं बघून शिट्टी मारत नसल्या तरी मुलींच्या गृपमध्येही मुलांवर चर्चा होताच असतात.या ग्रुपमध्ये दाढी असलेल्या मुलांबाबत काय चर्चा होतात याची चाचपणी आम्ही केली आणि मिळाली मजेशीर उत्तर !दाढीने मुलांना किती फरक पडतो माहिती नाही पण त्यांच्याकडे बघणाऱ्या तरुणींना मात्र निश्चितच फरक पडतो. याबाबत आम्ही तरुणींना प्रश्न विचारले आणि त्यांनी त्याची भन्नाट उत्तरही दिली. 

       गौरी म्हणाली, मला दाढी असलेली मुलं जास्त हँडसम वाटतात.नुसता गोरा, उंच आणि शर्टींग करून येणाऱ्या मुलापेक्षा जरा ट्रीम दाढी आणि कॅज्युअल लुक असेल तर ती मुलं जास्त लक्षात राहतात.

       सुप्रियाने मात्र याबाबत वेगळे मत मांडले आहे.ती सांगते, माझा नवरा पूर्वी दाढी ठेवत नव्हता.त्याचे व्यक्तिमत्व चारचौघांसारखे होते. लग्नानंतर मी त्याला दाढी कॅरी करायचा ऑप्शन दिला.फक्त दाढीमुळे त्याची पर्सनॅलिटी बदलली आहे. आता तो जास्त आकर्षक दिसतो असं मला वाटत. 

          फर्स्ट इयरला असलेल्या कल्याणीनेही दाढी असलेले मुलं जास्त रावडी वाटत असल्याचं सांगितलं.मुलाच्या रंगापेक्षा त्याच्या पर्सनॅलिटीतला स्ट्रॉन्गनेस तिला अधिक भावतो. कॉलेजमध्ये असा एखादा मुलगा असेल तर त्याची ग्रुपमध्ये चर्चा होते असंही तिनं सांगितलं.विशेषतः दिल चाहता मधल्या आमीरची स्टाईल तिला आवडते. 

        कश्मिरा म्हणाली, मला इतरवेळी नाही पण उत्सवांच्या काळात म्हणजे गणपती, दिवाळीत कुडता आणि दाढी वाढलेली मुलं बघायला जास्त भारी वाटतात.मी ओळख नसली तरी चांगल्या दिसणाऱ्या मुलाला दाढीविषयी कॉम्प्लिमेंट देते आणि मला त्यात काहीही गैर वाटत नाही.

        पूर्वा म्हणाली, मला नाही वाटतं दाढी हा चर्चेचा विषय असू शकतो.आमचे केस वाढले तर आम्ही कट करतो.त्यामुळे मुलांनी त्यांची  दाढी कशी ठेवायची हा त्यांचा निर्णय आहे. आणि त्याने फार काही फरकही पडत नाही. 

        शमिकाने मुद्दा मांडला की,मला दाढी मुलांचा दागिना वाटतो.दाढी असलेला मुलगा सगळ्या कपड्यांमध्ये भारी दिसतो.त्याला टी-शर्ट, कुडता, थ्री-पीस काहीही भारी दिसत.माझ्या मित्राला मी विराट कोहलीसारखी दाढी ठेवायला सांगितली आहे. 

Web Title: World Beard Day: observation of girls about the bearded boys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.