‘वल्र्ड कप फोटो कॉन्टेस्ट’मध्ये बैजू पाटील यांना ब्रांझ

By admin | Published: December 7, 2014 01:25 AM2014-12-07T01:25:04+5:302014-12-07T01:25:04+5:30

फेडरेशन इंटरनॅशनल डेल आर्ट फोटोग्राफीच्या (एफआयएपी) वर्ल्ड कप फोटो कॉन्टेस्टमध्ये प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्नकार बैजू पाटील यांना ब्रांझ पदक मिळाले.

In the World Cup photo contest, Baiju Patil is bronze | ‘वल्र्ड कप फोटो कॉन्टेस्ट’मध्ये बैजू पाटील यांना ब्रांझ

‘वल्र्ड कप फोटो कॉन्टेस्ट’मध्ये बैजू पाटील यांना ब्रांझ

Next
औरंगाबाद : वन्यजीव छायाचित्नणामध्ये नावाजलेल्या तसेच फेडरेशन इंटरनॅशनल डेल आर्ट फोटोग्राफीच्या (एफआयएपी) वर्ल्ड कप फोटो कॉन्टेस्टमध्ये प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्नकार बैजू पाटील यांना ब्रांझ पदक मिळाले. 
या स्पर्धेत 24 देशांच्या 15क् छायाचित्नकारांनी भाग घेतला होता. त्यात बैजू यांनी जायकवाडी धरणात काढलेल्या छोटय़ा शराटी या पक्ष्याच्या (ग्लॉसी आयबीस) फोटोची निवड करण्यात आली. उद्या 7 डिसेंबरला बंगळुरू येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
एफआयएपीतर्फे दर पाच वर्षानी जागतिक स्तरावर वन्यजीव छायाचित्नणाची स्पर्धा घेण्यात येते. या वर्षी फेडरेशन ऑफ इंडियन फोटोग्राफी (एफआयपी) यांच्या सहकार्याने बंगळुरू येथे स्पर्धा घेण्यात आली. बैजू यांना ‘प्रोजेक्टेड डिजिटल इमेजेस’ या प्रकारात ब्रांझ पदक मिळाले. या स्पर्धाकाळात छायाचित्रणातील अनेक बारकावे आणि पैलू पाहाण्यात येतात.
या स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेतील छायाचित्नकाराचा फोटो सर्वोत्तम ठरला. 
या जागतिक स्पर्धेत इटलीला सुवर्ण पदक, फ्रान्सला रौप्य पदक आणि भारताला ब्रांझ पदक मिळाले. स्पर्धेत इंग्लंड, नेदरलँड, आर्यलड, ऑस्ट्रिया आदी प्रमुख देशांतील छायाचित्नकार सहभागी झाले होते.   जागतिक स्तरावर ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते बैजू यांना आतार्पयत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.  (प्रतिनिधी)
 
‘लोकमत’च्या
‘जन गण मन’ या 26 जानेवारी 2012 च्या विश्वविक्रमी सोहळ्याचे विक्रमी छायाचित्रही बैजू पाटील यांनी टिपले होते. 
 
च्‘लोकमत’ समूहाने बैजू पाटील यांचे वाइल्डस्केप हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉ. के. शंकर नारायणन आणि प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या हस्ते आणि ‘लोकमत’चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत राजभवन येथे करण्यात आले होते.
 
22 दिवस 13 तास अन् शेकडो क्लिक..
च्बैजू यांनी ग्लॉसी आयबीसचा फोटो पैठण येथील जायकवाडी धरणात काढला आहे. त्यांनी आजवर वन्यजीवांच्या काढलेल्या उत्कृष्ट फोटोंपैकी हा एक फोटो आहे. या फोटोसाठी त्यांना सतत 22 दिवस पहाटे पाच ते सायंकाळी सहा असे 13 तास परिश्रम घ्यावे लागले. त्यासाठी त्यांनी कॅमे:यातून शेकडो क्लिक घेतले. 2क्13 मध्ये पाण्याचा साठा कमी होता. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे छोटी छोटी तळी साचली होती. या तळ्यात असंख्य मासे होते. त्यांना खाण्यासाठी तेथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी गर्दी करायचे. बैजू यांनी सुरुवातीचे पाच दिवस जायकवाडी परिसरातील विविध ठिकाणचा केवळ अभ्यास केला. त्यानंतर ग्लॉसी आयबीस तेथे सातत्याने येत असल्याचे निदर्शनास आले. म्हणून एके दिवशी तासन्तास कॅमेरा घेऊन एकाच ठिकाणी तळ ठोकून बसल्यानंतर दोन ग्लॉसी आयबीस एका छोटय़ा तळाच्या ठिकाणी आल्याचे दिसले. त्यातील एका आयबीसने मासा चोचीत पकडला. तितक्यात दुस:याने भक्षावर डल्ला मारण्यासाठी सोबतच्या आयबीसवर हल्ला चढवला. दोघांच्या भांडणात तो मासा चोचीतून निसटला आणि नेमका तो दुर्मीळ क्षण बैजू यांना टिपता आला. 

 

Web Title: In the World Cup photo contest, Baiju Patil is bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.