जागतिक संगीत दिन विशेष : संगीताशी नाळ जुळलेले पडद्यामागचे कलाकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:37 PM2019-06-21T12:37:54+5:302019-06-21T12:42:47+5:30

संगीताशी अतूट नाते असूनही कायम पडद्यामागे राहणारे कलाकार म्हणजे वाद्य कारागीर...

World Music Day Special: off screen artists in Music! | जागतिक संगीत दिन विशेष : संगीताशी नाळ जुळलेले पडद्यामागचे कलाकार!

जागतिक संगीत दिन विशेष : संगीताशी नाळ जुळलेले पडद्यामागचे कलाकार!

Next
ठळक मुद्देगायन, वादन खऱ्या अर्थाने खुलवणारे वाद्य कारागीरही संगीत क्षेत्राचा महत्वाचा स्तंभसंगीत कधीच लोप पावणार नाही. कारण, ते अमर, अभिजाततबला, पखवाज, ढोलक, ढोलकी, जेंबे अशा वाद्यांना आजही पूर्वीइतकीच मागणीइलेक्ट्रॉनिक वाद्यांमुळे पारंपरिक वाद्यांचे महत्व कमी झालेले नाही

प्रज्ञा केळकर-सिंग 
पुणे : सूर, ताल, लय यांचा अनोखा मिलाफ असणारे अभिजात संगीत प्रत्येकालाच भुरळ घालते. या कलेशी थेट नाळ जुळणे म्हणजे अहोभाग्यच! मात्र, संगीताशी अतूट नाते असूनही कायम पडद्यामागे राहणारे कलाकार म्हणजे वाद्य कारागीर. वाद्य कारागिरी ही संगीतसाधनाच असते, या कलेचेही संगोपन व्हावे, अशा भावना या पडद्यामागच्या कलाकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. काळ कितीही बदलला तरी संगीत अभिजातच आहे, जागतिक स्तरावर संगीताचे महत्व वादातीत आहे, असा सूरही या कलाकारांनी आळवला.
२१ जून अर्थात जागतिक संगीत दिवस. संगीत लोकाभिमुख व्हावे, यासाठी गायक, वादक प्रयत्नशील असतातच. परंतु, गायन, वादन खऱ्या अर्थाने खुलवणारे वाद्य कारागीरही संगीत क्षेत्राचा महत्वाचा स्तंभ आहे. तंबोरा सुरात लागला नाही तर गाणे फुलत नाही. सूर-तालाचे समीकरण जमवायचे असेल तर संगीताशी संबंधित प्रत्येक घटकाने संगीताचा बारकाईने अभ्यास करावा, असे वाद्य कारागीरांनी सांगितले. 
पुरुषोत्तम जोग म्हणाले, ‘मी २००० सालापासून या क्षेत्रात कार्यरत आहे. व्हायोलिन, तबला, तानपुरा, गिटार, मेंडोलिन अशी अनेक वाद्ये आपल्याकडे दुरुस्तीसाठी येतात. वाद्यांचे ट्युनिंग हा आनंददायी प्रकार असतो. वाद्य कारागीर हे पडद्यामागचे कलाकार असतात. मात्र, तरीही संगीत क्षेत्राचा एक अविभाज्य घटक असल्याचे समाधान वाटते. इलेक्ट्रॉनिक वाद्ये केवळ सोय म्हणून ठीक आहेत. मात्र, पारंपरिक वाद्यांचे सौैंदर्य काही वेगळेच असते. संगीताकडे नवीन पिढीचा ओढा वाढत आहे. संगीत कधीच लोप पावणार नाही. कारण, ते अमर, अभिजात आहे.’
विजय नाईक म्हणाले, ‘तबला, पखवाज, ढोलक, ढोलकी, जेंबे अशा वाद्यांना आजही पूर्वीइतकीच मागणी आहे. वाद्य कारागिरीला अद्याप हक्काचे व्यासपीठ मिळालेले नाही. मात्र, ही कला संगीताशी असलेले नाते अधिकाधिक दृढ करत राहते. इलेक्ट्रॉनिक वाद्यांमुळे पारंपरिक वाद्यांचे महत्व कमी झालेले नाही.’
-----------
खाजाभाई शेख हे गेली ५५-६० वर्षे विविध प्रकारची चर्मवाद्ये बनविणे, त्यांची दुरूस्ती करण्याचे कार्य करतात. उस्ताद अहमदजान थिरकवॉ खॉसाहेब, उस्ताद अल्लारखॉसाहेब, पं. बिरजू महाराज यांनी त्यांच्या कारिगिरीचे कौतुक केले होते. कथक नृत्यगुरू प्रभा मराठे, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे सहकारी श्री. विष्णू घाग व श्री. ज. स. मराठे, सुधाकर मराठे असे शास्त्रीय संगीतातील कलावंत तर लावणीसम्राज्ञी रोशन सातारकर, सुरेखा पुणेकर, अमर पुणेकर, विविध प्रांतातील कव्वाल मंडळी तसेच घाशीराम कोतवाल, गाढवाचं लग्न अशा नाटकांमधील साथीदारांच्या वाद्यांची दुरुस्ती खाजाभार्इंनी केली आहे. त्यांचे चिरंजीव सलीमभाईही निष्णात वाद्यकारागिर आहेत. 

Web Title: World Music Day Special: off screen artists in Music!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.