शेकडोंच्या उपस्थितीत सृष्टीचा विश्वविक्रम

By admin | Published: August 24, 2014 01:15 AM2014-08-24T01:15:23+5:302014-08-24T01:15:23+5:30

चिमुकल्या सृष्टी शर्माने शनिवार अविस्मरणीय ठरविला. लिंबो स्केटिंगमध्ये १६.५ सेंटिमीटर इतक्या लहान उंचीमधून सहीसलामत बाहेर पडून या दहा वर्षांच्या खेळाडूने विश्वविक्रमी कामगिरी करीत

World record of hundreds in the presence of hundreds | शेकडोंच्या उपस्थितीत सृष्टीचा विश्वविक्रम

शेकडोंच्या उपस्थितीत सृष्टीचा विश्वविक्रम

Next

लिंबो स्केटिंंग : १६.५ सेंटिमीटर उंच बारमधून बाहेर पडली, गिनीज बुकात नोंद होणार
नागपूर : चिमुकल्या सृष्टी शर्माने शनिवार अविस्मरणीय ठरविला. लिंबो स्केटिंगमध्ये १६.५ सेंटिमीटर इतक्या लहान उंचीमधून सहीसलामत बाहेर पडून या दहा वर्षांच्या खेळाडूने विश्वविक्रमी कामगिरी करीत नागपूरला नवी ओळख दिली. सृष्टीची ही कामगिरी लवकरच गिनीज बुकात नोंदली जाणार आहे.
लोकमत मीडिया लिमिटेडतर्फे कॅम्पस् क्लब व बालविकास मंच अंतर्गत ‘बेटी बचाव’ मोहिमेंतर्गत झाशी राणी चौकातील माहेश्वरी सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चेन्नईचा मॅडविन डेव्हा याने जून २०१४ रोजी नोंदविलेला २३ सेंटिमीटर उंचीचा विक्रम मागे टाकण्यासाठी सृष्टीने १९ सेंटिमीटर उंचीपासून सुरुवात केली. ही उंची पार करताच तिचा विश्वविक्रम पूर्ण झाला होता. पण तरीही निर्धार कायम होता. मग १८ सेंटिमीटर , १७ सेंटिमीटर आणि त्याहूनही लहान १६.५ सेंटिमीटरची उंची तिच्या निर्धारात व्यत्यय आणू शकली नाही.
मुलीच्या देदीप्यमान कामगिरीने वडील धर्मेंद्र, आई शिखा, बहीण सिद्धा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. शब्द सुचेनासे झाले होते. वडिलांनी या विशेष मोहिमेसाठी लोकमतचे आभार मानले. सृष्टीच्या विश्वविक्रमी कामगिरीचे साक्षीदार होण्यासाठी लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खा. विजय दर्डा, संचालक (परिचालन) अशोक जैन, संचालक (तांत्रिक) सेवानिवृत्त विंग कमांडर रमेश बोरा, महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशनचे महासचिव प्रा. उपेंद्र वर्मा, प्रभारी क्रीडा संचालक विजय संतान, वेकोलितील एरिया ट्रेनिंग आॅफिसर दिनेश चौरसिया, मोहोड बिल्डसचे संचालक सतीश मोहोड, लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्रा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. खा. दर्डा यांनी सृष्टीचा शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन लोकमत समूहाच्यावतीने गौरव केला.
सुरुवातीला लोकमतचे संस्थापक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा ‘बाबूजी’ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. दीप प्रज्वलनाद्वारे कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक मतीन खान यांनी केले. सृष्टीच्या कामगिरीचे साक्षीदार होण्यासाठी स्केटिंग खेळाडू, पालक, आणि लोकमत कॅम्पस क्लबचे शेकडो सदस्य उपस्थित होते. सर्वांसाठी आयोजकांतर्फे गीत संगीत आणि नृत्यांची मेजवानी सादर करण्यात आली. (प्रतिनिधी)
भावनात्मक क्षण : खा. दर्डा
लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी चिमुकली स्केटर सृष्टीच्या प्रयत्नांचे कौतुक करीत हा भावनात्मक क्षण असल्याचे सांगितले. ते म्हणाले,‘ सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या दहा वर्षांच्या कन्येने नवा विश्वविक्रम नोंदविला आहे. या यशामागे सृष्टी आणि तिच्या मातापित्यांची मेहनत तसेच बहीण सिद्धीची जिद्द आहे. प्रत्येकाकडे काहीतरी गुण असतो. पण योग्य व्यासपीठ मिळण्याची खरी गरज आहे. ‘कोशिश करने वालो की हार नही होती’ हे सृष्टीने स्वप्रयत्नांतून सिद्ध केले आहे.’

Web Title: World record of hundreds in the presence of hundreds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.