‘कुराण’ पठणाचा विश्वविक्रम

By admin | Published: February 6, 2015 01:00 AM2015-02-06T01:00:34+5:302015-02-06T01:00:34+5:30

कुराणातील मार्गदर्शक तत्त्वे जीवनाची आदर्श आचारसंहिताच सांगत नाहीत तर शांती अन् बंधूभावाचा मार्गही दाखवतात, हाच संदेश आणखी व्यापक पद्धतीने जगभरात पोहचविण्यासाठी आपल्या

World Record of 'Quran' Pathak | ‘कुराण’ पठणाचा विश्वविक्रम

‘कुराण’ पठणाचा विश्वविक्रम

Next

११५ तास सलग वाचन : मोहम्मद शहजाद परवेजने दिला शांतीचा संदेश
नागपूर : कुराणातील मार्गदर्शक तत्त्वे जीवनाची आदर्श आचारसंहिताच सांगत नाहीत तर शांती अन् बंधूभावाचा मार्गही दाखवतात, हाच संदेश आणखी व्यापक पद्धतीने जगभरात पोहचविण्यासाठी आपल्या नागपुरातील मोहम्मद शहजाद परवेज यांनी ११५ तास सलग कुराण पठण करून एक नवा विश्वविक्रम बनविला आहे़ ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३५ मिनिटांनी मोहम्मद शहजाद परवेज यांनी कुराण पठणास सुरुवात केली होती़ आज ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३५ मिनिटांनी त्यांनी हा विश्वविक्रम केला़
यापूर्वी सलग वाचनाचा एक विक्रम काठमांडू येथील दीपक शर्मा यांच्या नावे आहे. त्यांनी २४ सप्टेंबर, २००८ रोजी ११३ तास १५ मिनिटे वाचनाचा जागतिक विक्रम केला होता़ हा विक्रम शहजाद परवेज यांनी मोडला आहे़ गिनिज वर्ल्ड फिल्म कास्टिंग एजन्सीचे संयोजक यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते़ शहजाद परवेज यांचा उत्साह वाढविण्यासाठी शहरभरातून मुस्लीम बांधव या ठिकाणी आले होते़ यावेळी आ़ डॉ़ मिलिंद माने, माजी मंत्री डॉ़ नितीन राऊत, नगरसेवक अभिषेक शंभरकर, मनीष पाटील, मोहम्मद जमाल, अ‍ॅड़ शशिभूषण वाहणे, नितीन पाटील, डॉ़ इरफान सय्यद, मो़ अशरद उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: World Record of 'Quran' Pathak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.