चिमुकल्या वरदचा सायकलिंगद्वारे विश्वविक्रम

By admin | Published: May 3, 2017 12:47 AM2017-05-03T00:47:14+5:302017-05-03T00:47:14+5:30

बेळगाव ते कोल्हापूर अंतर साडेसहा तासांत पूर्ण

World Record by Vertical Cycling | चिमुकल्या वरदचा सायकलिंगद्वारे विश्वविक्रम

चिमुकल्या वरदचा सायकलिंगद्वारे विश्वविक्रम

Next

कोल्हापूर : कोल्हापूर ते बेळगाव असा १२८ किलोमीटर सलग सहा तास ३० मिनिटे सायकल चालवित साडेसहा वर्षांच्या वरद वैभव चंदगडकरने एकमे रोजी विश्वविक्रम केला. त्याच्या या उपक्रमाची नोंद युनिक बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड तसेच एशिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.
बेळगाव येथून एक मे रोजी पहाटे ४ वा. महादेव मंदिर, मिलिटरी कॅम्प येथून या उपक्रमास सुरुवात केली. १२८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्डसाठी नऊ तासांचा कालावधी दिलेला असताना त्याने सहा तास ३० मिनिटांत हे अंतर पार केले. भवानी मंडप येथे सकाळी १०.४० वाजता या उपक्रमाची सांगता झाली.
या उपक्रमाचे इंडिया बुकचे निरीक्षक विश्वजित रॉय, एशिया बुकचे निरीक्षक महेश कदम, युनिक बुक चे निरीक्षक मि. रेहेमान यांनी काम पाहिले.
भवानी मंडप येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. संपतराव पोवार, किशोर देशपांडे, वैभव चंदगडकर, तुषार देसाई, आदी उपस्थित होते.

Web Title: World Record by Vertical Cycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.