जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष : गर्भावस्थेत टाळा '' हायपर टेन्शन ''

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 12:33 PM2019-05-17T12:33:38+5:302019-05-17T13:16:05+5:30

मातृत्वाचा काळ सुखाचा, हीच भावना गर्भावस्थेत प्रत्येक महिलेच्या मनात निर्माण झालेली असते. मात्र, या सुखद भावनेबरोबरच अनेक शंका-कुशंकांनी मनात घर केलेले असते.

World Tension Day Special: Avoid "Hyper Tension" in Pregnancy period | जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष : गर्भावस्थेत टाळा '' हायपर टेन्शन ''

जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष : गर्भावस्थेत टाळा '' हायपर टेन्शन ''

googlenewsNext
ठळक मुद्देप्री-एक्ल्मप्शियाचे वेळेत निदान न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माणसुमारे ५ टक्के गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाब गर्भावस्थेत प्रीएक्ल्मप्शिया असलेल्या मातांची पूर्ण दिवस भरण्याआधीच ठरवून डिलिव्हरीअ‍ॅस्पिरिनचा डोस दिल्यास (बेबी अ‍ॅस्पिरिन) प्रीएक्ल्मप्शिया होण्याची शक्यता कमी

पुणे: धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली, आहारातील बदल यामुळे गर्भावस्थेत गुंतागुंत निर्माण होण्याची भीती असते. गर्भावस्थेतील हायपर टेन्शन हा बहुतांश महिलांना आजकाल सतावणारी समस्या बनू पाहत आहे. सुमारे ५ टक्के गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळतो. त्यातूनच प्री-एक्ल्मप्शियाची शक्यता वाढीस लागते.
मातृत्वाचा काळ सुखाचा, हीच भावना गर्भावस्थेत प्रत्येक महिलेच्या मनात निर्माण झालेली असते. मात्र, या सुखद भावनेबरोबरच अनेक शंका-कुशंकांनी मनात घर केलेले असते. बरेचदा गर्भवती महिलांमध्ये हायपर टेन्शन (रक्तदाब वाढणे), हातांना आणि पायांना सूज आणि मूत्रात प्रोटीन जमा होणे, अशा समस्या उद्भवू शकतात. यालाच वैद्यकीय भाषेत ‘प्री-एक्ल्मप्शिया’ असे म्हटले जाते.
प्री-एक्ल्मप्शियाचे वेळेत निदान न झाल्यास त्यातून माता आणि बाळासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यातून मातेमध्ये एक्ल्मप्शिया (गंभीर स्थिती) आणि ‘हेल्प’ (एचईएलएलपी-हेमोलायसिस, यकृतातील एन्झाइम्स वाढणे, प्लेटलेट्स कमी होणे) ही स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यातून मूत्रपिंडाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होऊ शकते, अशी माहिती प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार यांनी ‘लोकमत’श्ी बोलताना दिली.
रक्तदाब वाढणे हे प्री-एक्ल्मप्शियाचे पहिले लक्षण असू शकते. त्यामुळे, हायपर टेन्शनचे वेळात निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे सुरू करणे, वैद्यकीय चाचण्या, बाळाच्या हालचालींचे मोजमाप, सोनोग्राफी आणि डॉपलरच्या माध्यमातून माता आणि गर्भाशयातील बाळावर देखरेख ठेवणेही महत्त्वाचे आहे.
देखभालीच्या यापैकी कोणत्याही पद्धतीतून मातेला किंवा बाळाला धोका असल्याचे निदान होत असल्यास डिलिव्हरी करावी लागते. त्यामुळेच, गर्भावस्थेत प्रीएक्ल्मप्शिया असलेल्या मातांची पूर्ण दिवस भरण्याआधीच ठरवून डिलिव्हरी केली जाते. प्री-एक्ल्मप्शियामागे कोणतेही एक ठोस कारण नाही. मात्र, गर्भाच्या वारेत किंवा गर्भवेष्टनात पुरेशा रक्तवाहिन्या तयार न होणे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे पाहण्यात आले आहेत. शिवाय, बरेचदा नंतरच्या गरोदरपणाच्या तुलनेत पहिल्या गरोदरपणातच प्रीएक्ल्मेप्शियाचा त्रास होतो.
---------------
प्रीएक्ल्मप्शिया रोखण्यासाठी गेल्या काही दशकांमध्ये संशोधन करण्यात आले आहे. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यात कमी मात्रेत अ‍ॅस्पिरिनचा डोस दिल्यास (बेबी अ‍ॅस्पिरिन) प्रीएक्ल्मप्शिया होण्याची शक्यता कमी होते, असे निदर्शनास आले आहे. डॉपलर सोनोग्राफीसारख्या स्क्रीनिंग पद्धती आणि गरोदरपणाच्या तिस-या महिन्यात काही एन्झाइम्ससाठी रक्तचाचणी केल्यासही संबंधित महिलेला प्रीएक्ल्मप्शिया होण्याची शक्यता आहे का, याचा अंदाज बांधता येतो. वैद्यकीय उपचारांमधील आधुनिकता हा एक मोठा लाभ आहे आणि या प्रकारच्या आजारांचे नियंत्रण आणि ते उद्भवू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे, माता आणि तिच्या गभार्तील बाळाच्या जीवाला धोका ठरणा-या अशा आजारांपासून त्यांना वाचवता येईल.
- डॉ. राजेश्वरी पवार, कन्सलटंट, प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ

Web Title: World Tension Day Special: Avoid "Hyper Tension" in Pregnancy period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.