जागतिक आदिवासी दिनी आदिवासींचे उपोषण
By Admin | Published: August 9, 2016 12:32 PM2016-08-09T12:32:22+5:302016-08-09T12:33:27+5:30
दिवासी दिनाच्या दिवशीच आदिवासी बांधवांवर अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे चिञ बागलाण तालुक्यात बघायला मिळत आहे
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ९ - आज जागतिक आदिवासी दिन. शासनाने आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासींबद्दल कळवळा व्यक्त करत वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. मात्र आदिवासी दिनाच्या दिवशीच आदिवासी बांधवांवर अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे चिञ बागलाण तालुक्यात बघायला मिळत आहे .
ठेंगोडा ता.बागलाण येथिल आदिवासी बांधव गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून राहत असलेली वस्तीची जागा खाजगी मालकिची असल्याने शेतमालकाने कायदेशीर मार्गाने पोलिस बंदोबस्तात आदिवासींची घरे उध्वस्त केली .
माञ ज्या शेतकऱ्यांने आदिवासींचे घरे उध्दस्त केले त्यानेच सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे सिध्द झाले आहे. सदर शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढा यासाठी या आदिवासींनी तहसिलदार बागलाण यांना निवेदन दिले आहे मात्र.सदर अतिक्रमण काढण्यास विलंब होत असल्याने या आदिवासींनी पंधरा दिवसापुर्वी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन केले होते. माञ पंधरा दिवसात कार्यवाही करु असे तोंडी आश्वासन देऊन आदिवासींची बोळवन केली होती . माञ अतिक्रमण काढलेच नसल्याने या आदिवासिंनी सोमवार पासुन पुन्हा तहसिल आवारात उपोषण सुरु केले आहे. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आदिवासींनाच उपोषण करावे लागत आहे.