जगातील सर्वांत लठ्ठ महिला मुंबईत दाखल

By Admin | Published: February 12, 2017 02:12 AM2017-02-12T02:12:10+5:302017-02-12T05:54:24+5:30

जगातील सर्वांत लठ्ठ महिला असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमद हिला शनिवारी मुंबईत आणण्यात आले. मुंबई विमानतळावर सुमारे पहाटे ४.१०च्या दरम्यान तिचे विमान

The world's tallest women enter Mumbai | जगातील सर्वांत लठ्ठ महिला मुंबईत दाखल

जगातील सर्वांत लठ्ठ महिला मुंबईत दाखल

googlenewsNext

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमद हिला शनिवारी मुंबईत आणण्यात आले. मुंबई विमानतळावर सुमारे पहाटे ४.१०च्या दरम्यान तिचे विमान पोहोचले, त्यानंतर ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय इमानला हलविण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. इमानवर करण्यात येणाऱ्या बेरिएट्रीक शस्त्रक्रियेनंतर इमानला सहा महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
इजिप्त एअरच्या विशेष एअरबसने आलेल्या इमानसोबत डॉ. अपर्णा भास्कर, डॉ. कमलेश बोहरा आणि त्यांची बहीण शायमा अहमद होत्या. या वेळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेट क्र. ५मधून इमानला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर ओपन ट्रकमधून रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या ताफ्यासह चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयाकडे नेण्यात आले.
इमानसाठी सैफी रुग्णालयात सुमारे २ कोटी रुपये खर्च करून तिच्यासाठी वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. इमानसाठी उभारण्यात आलेल्या ‘वन बेड हॉस्पिटल’मध्ये एक आॅपरेशन थिएटर, एक अतिदक्षता विभाग, डॉक्टरांसाठी खोली, दोन विश्रांतीगृहे आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रूम असणार आहे. यामध्ये ७ फूट रुंद दरवाजे बांधण्यात आले आहेत तसेच तिच्यासाठी केलेला बेड ७ फूट रुंद असणार आहे. डॉ. मुजफ्फल लकडावाला हे इमानवर शस्त्रक्रिया करणार आहेत. काही दिवसांपूर्वी टिष्ट्वटरवर भारताच्या पररारष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना तिची मदत करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत स्वराज यांनी भारतात येण्यासाठी वैद्यकीय व्हिसा देऊ केला होता. (प्रतिनिधी)


आई-बहिणीवर अवलंबून
इजिप्तमधल्या अलेक्झांड्रीयामध्ये राहणारी ३६ वर्षीय इमान ही जगातील सगळ्यात लठ्ठ महिला आहे. इमान ही गेल्या २५ वर्षांपासून घरातून बाहेरच पडलेली नाही, तिला बिछान्यावरून हलताही येत नाही.
आपल्या दैनंदिन क्रियेसाठी ती पूर्णपणे आपल्या आई आणि बहिणीवर अवलंबून असते. इमानचे लहानपणापासूनच वजन हे तिच्या वयापेक्षा अधिक होते.
जन्माच्या वेळीच तिचे वजन जवळपास पाच किलोच्या आसपास होते. ती ११ वर्षांची असल्यापासून वजनामुळे तिला नीट उभे राहता यायचे नाही. त्यातूनच अर्धांगवायूचा झटका आल्याने तिला शाळाही सोडावी लागली.
गेल्या २५ वर्षांपासून तिची आई आणि बहीण तिची सेवा करीत आहेत. इमान पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी यांच्याकडे वैद्यकीय साहाय्य मागितले होते.

लवकरच उपचार सुरू
इजिप्तहून मुंबईत यायला इमानला पाच तासांचा प्रवास करावा लागला. या प्रवासादरम्यान इमानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. सैफी रुग्णालयात दाखल करताना इजिप्त दूतावासाचे अधिकारी अहमद खलिल उपस्थित होते. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, इमानला सुरक्षितरीत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, लवकरच तिच्यावर उपचार सुरू करण्यात येतील.

Web Title: The world's tallest women enter Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.