चिंतेत भर! राज्यात कोरोनाचे पावणेतीन लाख सक्रिय रुग्ण, दिवसभरात ३९१ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 03:38 AM2020-09-13T03:38:21+5:302020-09-13T03:38:44+5:30

दिवसभरात १३,४९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ७ लाख २८ हजार ५१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत पुणे आघाडीवर असून, त्याखालोखाल मुंबई, ठाणे आणि नागपूर हे जिल्हे आहेत.

Worry! Corona's 53 lakh active patients in the state, 391 deaths in a day | चिंतेत भर! राज्यात कोरोनाचे पावणेतीन लाख सक्रिय रुग्ण, दिवसभरात ३९१ मृत्यू

चिंतेत भर! राज्यात कोरोनाचे पावणेतीन लाख सक्रिय रुग्ण, दिवसभरात ३९१ मृत्यू

Next

मुंबई : राज्यात दिवसभरात २२ हजार ८४ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, ३९१ मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ३७ हजार ७६५ झाली असून, मृतांचा आकडा २९ हजार ११५ एवढा आहे. राज्यात सध्या तब्बल २ लाख ७९ हजार ७६८ सक्रिय रुणांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात १३,४९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ७ लाख २८ हजार ५१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत पुणे आघाडीवर असून, त्याखालोखाल मुंबई, ठाणे आणि नागपूर हे जिल्हे आहेत.
राज्यात ग्रामीण भागात दिवसागणिक झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे यंत्रणांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.२ टक्क्यांवर आले असून, मृत्युदर २.८१ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ३९१ मृत्यूंमध्ये मुंबई ४२, ठाणे ४, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा ७, कल्याण-डोंबिवली मनपा १, भिंवडी-निजामपूर मनपा १, मीरा- भार्इंदर मनपा १, पालघर ४, वसई-विरार मनपा ५, रायगड ९, पनवेल मनपा १, नाशिक ७, नाशिक मनपा ३, अहमदनगर १४, अहमदनगर मनपा ३, धुळे ३, धुळे मनपा २, जळगाव ६, जळगाव मनपा १, नंदुरबार २, पुणे २०, पुणे मनपा २५, पिंपरी-चिंचवड मनपा १६, सोलापूर १९, सोलापूर मनपा ३, सातारा १८, कोल्हापूर १४, कोल्हापूर मनपा ९, सांगली २२, सांगली-मिरज- कुपवाड मनपा ९, सिंधुदुर्ग ७, रत्नागिरी २, औरंगाबाद ८, औरंगाबाद मनपा ४, परभणी ४, परभणी मनपा २, लातूर ३, लातूर मनपा २, उस्मानाबाद ४, बीड २, नांदेड १०, नांदेड मनपा ६, अकोला २, अकोला मनपा ३, अमरावती ५, अमरावती मनपा ३, यवतमाळ ४, वाशिम २, नागूपर १०, नागपूर मनपा ३०, भंडारा १, गोंदिया १, गडचिरोली १ आणि अन्य राज्य/देशातील ३ रुग्णांचा समावेश आहे.
पुण्यात ७५ हजार ६१० सक्रिय रुग्ण असून, ही देशभरातील सर्वाधिक नोंद आहे. राज्यात त्याखालोखाल मुंबईत २९ हजार, ठाण्यात २८ हजार ७६८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत रुग्णदुपटीचा काळ ५८ दिवसांवर
मुंबईत रुग्ण दुपटीचा दर ५८ दिवसांवर आला आहे. शनिवारी २,३५० रुग्णांचे निदान झाले असून, ४२ मृत्यू झाले. परिणामी, एकूण बाधितांची संख्या १ लाख ६७ हजार ६५६ रुग्ण असून, मृतांचा आकडा ८,१०९ आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्येही २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. १ लाख ३० हजार १६ जण बरे झाले असून २९,१७६ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Worry! Corona's 53 lakh active patients in the state, 391 deaths in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.