‘मुलाचे तरी मत पडले असते का?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:15 AM2017-12-02T05:15:19+5:302017-12-02T05:15:23+5:30
प्रसाद लाड यांच्याऐवजी मला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असती, तर शिवसेनेचे पंधरा आमदार फोडले असते, असा दावा नारायण राणे करत असले, तरी काँग्रेसने व्हीप बजावला असता मुलगा नीतेश यांचे तरी मत त्यांना पडले असते का
सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) : प्रसाद लाड यांच्याऐवजी मला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असती, तर शिवसेनेचे पंधरा आमदार फोडले असते, असा दावा नारायण राणे करत असले, तरी काँग्रेसने व्हीप बजावला असता मुलगा नीतेश यांचे तरी मत त्यांना पडले असते का, असा टोला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी लागवला.
केसरकर म्हणाले, राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडताना विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला, पण भाजपने त्यांना साधी विधानपरिषेदेची उमेदवारीही दिली नाही. यातूनच त्यांची राजकारणातील किती पत शिल्लक राहिली आहे हे दिसून येते. सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजपने युती करून निवडणूक लढवली, तर तिसºया पक्षाला संधीही मिळणार नाही. पण शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढवत नसल्याने त्याचा फायदा इतरांना होत आहे.