Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 09:27 AM2024-11-16T09:27:57+5:302024-11-16T09:29:59+5:30

Navneet Rana Anandrao Adsul: माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी टीकास्त्र डागलं आहे. राणा त्यांच्या पतीच्या मतदारसंघात प्रचाराला का गेल्या नाहीत? असा सवालही त्यांनी केला. 

"would go everywhere and just bark"; Anandrao Adsul's criticism of Navneet Rana | Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

Anandrao Adsul Navneet Rana News: अमरावतीच्या राजकारणात आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रूत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्याला पुन्हा फोडणी मिळाल्याचे दिसत आहे. अमरावतीत राणा दाम्पत्य महायुतीच्या माध्यमातून राजकीय मूळं बळकट करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा असून, त्यावरूनच नवनीत राणा आणि त्यांचे पती रवि राणा यांच्यावर आनंदराव अडसूळ यांनी सडकून टीका केली आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमरावतीतील सभेत राणा दाम्पत्यांचे कान टोचले होते. त्याच मुद्द्यावर बोलताना आनंद अडसूळ म्हणाले, "समजावलं पण, ते समजावण्याच्या पलिकडे आहेत. ज्याला काही बुद्धी आहे, त्यांना समजतं. ज्याला बुद्धी नाही, वात्रट बुद्धी त्यांना नाही समजत. ठीक आहे, आम्ही तो विषय सोडून दिला आहे." 

सगळीकडे जायचं, फक्त भुंकायचं; अडसूळांची टीका

"तिच्या नवऱ्याच्या तिथे ती अजून प्रचाराला का गेली नाही? हा संशोधनाचा विषय आहे. सगळीकडे जायचं, फक्त भुंकायचं. अरे पण घरचं सोडून तुम्ही फिरता आहात, ते काय?", असा सवालही अडसूळ यांनी नवनीत राणांना केला.  

नवनीत राणा लोकसभेला प्रचाराला न गेल्याने नाराज असल्याचा प्रश्न अडसूळ यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "लोकसभेला तर आम्ही जाहीर सांगितलं होतं. अभिजित त्यांच्या व्यासपीठावर गेला होता, पण मी जाहीरपणे सांगितलं होतं की, माझी जागा काढून घेतलेली आहे. त्यांचं वागणं मला पसंत नाही. म्हणून मी अमित शाहांनाही सांगितलं होतं की, मी काही प्रचाराला जाणार नाही. पण, माझा पक्ष प्रचारात होता. आता ते मानत नसतील तर त्याला काय करणार."

"या रवि राणांनी दोन-तीन ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत. महायुतीमध्ये जे घडलं, ते आम्हाला स्वीकारावं लागतंय. महाविकास आघाडीला याचा जास्त फायदा होईल असे नाही. कारण महाविकास आघाडीमध्ये बरीच बिघाडी आहे", असे अडसूळ म्हणाले.

Web Title: "would go everywhere and just bark"; Anandrao Adsul's criticism of Navneet Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.