ब्रसेल्स स्फोटातील जखमी निधी मुंबईत परतली
By admin | Published: May 6, 2016 12:39 PM2016-05-06T12:39:20+5:302016-05-06T12:39:20+5:30
दोन महिन्यांपूर्वी ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात जखमी झालेली मुंबईची निधी चाफेकर शुक्रवारी सकाळी मुंबईत परतली.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - दोन महिन्यांपूर्वी ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात जखमी झालेली मुंबईची निधी चाफेकर शुक्रवारी सकाळी मुंबईत परतली. जेट एअरवेजमध्ये फ्लाईट अटेंडट असणारी निधी स्फोट झाला त्यावेळी ब्रसेल्स विमानतळावर होती. स्फोटानंतर सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या तिच्या फोटोमधून या बॉम्बस्फोटाची भीषणता जगासमोर आली होती.
बेल्जियममधील रुग्णालयात तिच्यावर ४० पेक्षा जास्त दिवस उपचार झाले. सकाळी सातवाजता जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईत आल्यानंतर तिला विमानतळावरुन थेट ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलवण्यात आले. निधीच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली असून, आता कुटुंबाजवळ आल्यामुळे ती आनंदी आहे. निधीच्या उपचारांचा पुढचा टप्पा आता मुंबईत आहे. जेट एअरवेज सर्व आवश्यक सहकार्य करेल. निधीला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत व तिचे लवकरात लवकर सामान्य आयुष्य सुरु झाले पाहिजे असे जेट एअरवेजने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
२२ मार्चला ब्रसेल्स विमानतळावर दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले होते. निधी या स्फोटात १५ टक्के भाजली होती. निधीच्या दोन मुलांना प्रथमच तिला भेटता येणार आहे.