गोदामे फोडणारी टोळी अखेर जेरबंद
By admin | Published: August 20, 2015 12:29 AM2015-08-20T00:29:49+5:302015-08-20T00:29:49+5:30
विविध कंपन्या, वितरकांची गोदामे फोडून लाखो रुपयांच्या मालाची लूट करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या
औरंगाबाद : विविध कंपन्या, वितरकांची गोदामे फोडून लाखो रुपयांच्या मालाची लूट करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. टोळीतील पाच आरोपी पसार झाले असून, आरोपींकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे चोरीचे टीव्ही, एलईडी आणि एक टेम्पो जप्त केला आहे.
राहुल वाहूळ (२७, रा. घनसावंगी) आणि चाँद पाशा शेख बनू (३२, रा. निजामगंज कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. टोळीचा प्रमुख धीरज गुगळे (रा. अहमदनगर), कबीर पठाण (धामणगाव), गोपाळ मुराडे (रा. इराला, ता. धाड, जि. बुलडाणा), शंकर वाघ (रा. वाळूज) आणि उद्धव राजदेव (रा. वाळूज) हे आरोपी फरार झाले आहेत.
पाच महिन्यांपूर्वी फोडले अहमदनगर येथे गोडाऊन
आरोपी राहुल आणि चाँद पाशा यांची पोलीस कोठडीत चौकशी केली असता आरोपींनी अहमदनगर येथील एमआयडीसीमधील एक गोडाऊन फोडून ७ लाख ३१ हजार ९७० रुपये किमतीचे टीव्ही, एलईडी, सॅमसंग कंपनीचा एलईडी, झेब्रोनिक
कंपनीचे होम थिएटर चोरल्याची कबुली दिली. आरोपींनी सोनई (जि. अहमदनगर), अहमदनगर एमआयडीसी, नाशिक जिल्ह्णातील मनमाड येथील गोडाऊन फोडल्याची कबुली दिली.