'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 04:27 PM2024-09-07T16:27:12+5:302024-09-07T16:29:29+5:30

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना भाजपा आमदार राजेंद्र राऊत यांनी आव्हान दिले, हे आव्हान जरांगे पाटील यांनी स्विकारले आहे.

Write from mahavikas aghadi about Maratha reservation Rajendra Rauta's challenge manoj Jarange patil also accepted the challenge | 'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यासाठी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता भाजपा आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राऊत यांनी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीकडून लिहिन घेण्याबाबत आव्हान केले आहे, यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम

काल बार्शी येथे बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, 'माजलगावच्या सभेत तुम्ही म्हणाला राजेंद्र राऊतच्या घरासमोर सभा घ्यायला जागा आहे का पाहा, तुम्ही जर कोणाला मॅनेज होणार नसाल, महायुतीला पाडून महाविकास आघाडीला निवडून आणायचा पाप तुमच्या मनात नसेल तर तुम्ही महाविकास आघाडीकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतीची भूमिका लिहून घ्या, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी, त्यांनी लिहून दिलं नाही तर आमदार राजेंद्र राऊत राजकीय संन्यास जाहीर करेल', असं आव्हान राऊत यांनी जरांगे पाटील यांना दिले होते. यावर आता जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी आज भाजपा आमदार राजेंद्र राऊत यांना प्रत्युत्तर दिले. जरांगे पाटील म्हणाले, ' मी तुमचं चॅलेंज स्विकारलं आहे, तुम्ही देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून लिहून घ्यायचं. तुम्ही लिहून आणलेला कागद मी मराठ्यांना देतो. मग मराठे महाविकास आघाडीकडून लिहून आणतील नाहीतर त्यांना पाडतील',असं प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी दिले.

जरांगे पाटलांनी सुरू केल्या बैठका

 मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी धारूर तालुक्यातील तेलगाव येथे आयोजित घोंगडी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, "फडणवीस हे आ. राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु मराठा समाज त्यांच्या या खेळीला ओळखून आहे आणि ती यशस्वी होऊ देणार नाही."

मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, "सरकारने मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यास आम्ही राजकारणात सहभागी होणार नाही. परंतु जर आरक्षण दिले नाही, तर आम्हाला पुढील पाऊले उचलावी लागतील." या इशाऱ्यानंतर त्यांनी मराठा समाजाला एकजुटीचे आवाहन केले.

Web Title: Write from mahavikas aghadi about Maratha reservation Rajendra Rauta's challenge manoj Jarange patil also accepted the challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.