Amruta Fadnavis : जागतिक कामांबद्दलचं नोबेल गेलं, पण अमृता फडणवीस यांना भारतरत्न द्या, हरी नरकेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 06:52 PM2021-11-02T18:52:00+5:302021-11-02T18:52:30+5:30
Amruta Fadnavis : पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. तसंच यावेळी त्यांना संताप अनावर झाला होता.
Amruta Fadnavis on Nawab Malik : मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्वीट केला. त्यानंतर भाजपचे ड्रग्स पेडलरशी काय कनेक्शन? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले. दरम्यान, या प्रकारानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन नवाब मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांचे आरोप फेटाळून लावले. परंतु यावेळी त्यांना संताप अनावर झाल्याचं दिसत होतं. या एकंदरीत घटनेवरून प्रा. हरी नरके यांनी अमृता फडणवीस यांना खोचक टोला लगावला.
अमृता फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रा. हरी नरके यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला. "मी अशी शिफारस करतो की, त्यांच्या जागतिक कीर्तीच्या कामांबद्दल त्यांना नोबेल गेला बाजार भारत रत्न तरी प्रदान करण्यात यावं. या गाण्याला पैसा पुरवणारा (निर्माता) ड्रगमाफिया सध्या गुजरातमध्ये तुरुंगात आहे. तो भाडोत्री होता असा खुलासा केला तर त्यांनी अशा दुय्यमतीय्यम दर्जाच्या माणसाचे नाव काल श्रेय नामावलीतून हटवले. अशा माणसाबरोबर फोटो काढून घेतला तेव्हाची त्यांची देहबोली बघा. जो माणूस इतका तिय्यम होता त्याला अंगठा दाखवत हसत फोटो काढतात? अनोळखी माणसाबरोबर अशी पोज देतात? तुम्ही काहीही खुलासे केले तरी या फोटोमधली चित्रभाषा लोकांना समजते बरं!," असं ते म्हणाले.
काय म्हणाल्या होत्या फडणवीस?
"तुम्हाला बिघडे नवाब व्हायचं आहे, तुम्हाला बिघडे नवाबची जी एनर्जी आहे ती सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा, तरंच महाराष्ट्र पुढे जाईल. अन्यथा आपलं खरं नाही. मलिक जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट करत आहेत, आमच्याकडे ना लँड बँक आहे, ना साखर कारखाने आहेत, त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही," असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. नवाब मलिक हे बेनकाब होत आहेत, काही सूचत नाही, निगेटीव्हीटी आलेली असते तेव्हा असं केलं जातं. सरळ मार्गाने जाणाऱ्या महिलांना का डिवचता, तेच आज माझ्यासोबत केलं जातंय. तुम्ही मर्द आहात ना मग देवेंद्रजींना डायरेक्ट टार्गेट करा, मला मध्ये नका आणू. माझ्या अंगावर कुणी आलं तर, मी सोडणार नाही. सोशल एक्टीव्हीस्ट म्हणून माझे विचार प्रकट करत असते आणि ते यापुढेही करत राहणार, असेही अमृता फडणवीस यांनी ठणकावून होतं.