लेखक, परीक्षकांच्या मानधनात वाढ
By admin | Published: December 18, 2014 05:34 AM2014-12-18T05:34:51+5:302014-12-18T05:34:51+5:30
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुस्तक प्रकाशन योजनेअंतर्गत मंडळाने लिहून घेतलेल्या पुस्तकाच्या लेखकास प्रत्येक प्रकाशनार्थ आणि
मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुस्तक प्रकाशन योजनेअंतर्गत मंडळाने लिहून घेतलेल्या पुस्तकाच्या लेखकास प्रत्येक प्रकाशनार्थ आणि हस्तलिखितांचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञांचे परिश्रम विचारात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे.
प्रकाशन योजनेअंतर्गत असणाऱ्या लेखक आणि परीक्षकांच्या मानधनात तब्बल सात वर्षांनी वाढ केली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राबविलेल्या पुस्तक प्रकाशन योजनेअंतर्गत पुस्तकाच्या लेखकास प्रत्येक प्रकाशनार्थ १००० शब्दांना ३०० रुपये आणि आलेल्या तज्ज्ञांना ५०० रुपये प्रति हस्तलिखित इतके मानधन पूर्वी देण्यात येत होते. मात्र यापुढे मानधनात वाढ करून लेखनासाठी प्रत्येक १००० शब्दांना ९०० रुपये आणि परीक्षण तज्ज्ञांना १ हजार ५०० रुपये एवढे मानधन मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या निर्णयानुसार एखाद्या लेखकाकडून लिहून घेतलेले पुस्तक किंवा मंडळाकडे प्रकाशनाकरीता प्राप्त झालेले एखाद्या लेखकाचे हस्तलिखित अशा दोन्ही प्रकारातील पुस्तकांच्या प्रकाशनाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून करण्यात येणार आहे.