साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार मराठीतील लेखक प्रणव सखदेव यांना प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 03:53 PM2022-03-31T15:53:10+5:302022-03-31T15:53:23+5:30
प्रणव सखदेव यांच्या काळेकरडे स्ट्रोक्स या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला
चेन्नई: साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा युवा साहित्यिक पुरस्कार मराठीतील लेखक प्रणव सखदेव यांना आज प्रदान करण्यात आला.
चेन्नई इथे आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कारप्रदान कार्यक्रमात प्रादेशिक भाषांतील युवा लेखकांना गौरवण्यात आले.
प्रणव सखदेव यांच्या काळेकरडे स्ट्रोक्स या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही कादंबरी आजच्या काळातील तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, बदलते नातेसंबंध, विखंडितता यांवर भाष्य करते व अस्तित्वाच्या प्रश्नांना भिडू पाहते.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कम्बार यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. हे 2021 सालासाठीचे पुरस्कार आहेत. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम तमिळ लेखक श्री. एस. रामकृष्णन उपस्थित होते.
या प्रसंगी साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यानी पुरस्कार विजेते लेखक आणि उपस्थितांचे स्वागत केले, तर साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.