‘रायटर’ लिहितात ठाण्यांचे भविष्य

By admin | Published: June 10, 2014 01:04 AM2014-06-10T01:04:06+5:302014-06-10T01:04:06+5:30

आपला पसारा वाढवत अधिक व्यापक काम करणार्‍या ‘रायटर’चे पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार वाढविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. दोन वर्षापूर्वी अंबाझरी आणि नुकतेच सदर ठाण्यात झालेल्या प्रकरणाने ही बाब

Writer writes Thanan's future | ‘रायटर’ लिहितात ठाण्यांचे भविष्य

‘रायटर’ लिहितात ठाण्यांचे भविष्य

Next

अपराधी कर्मचार्‍यांना जागा : अधिकार्‍यांना आश्रय
जगदीश जोशी - नागपूर
आपला पसारा वाढवत अधिक व्यापक काम करणार्‍या ‘रायटर’चे पोलीस स्टेशनमध्ये  भ्रष्टाचार वाढविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. दोन वर्षापूर्वी  अंबाझरी आणि नुकतेच सदर ठाण्यात झालेल्या प्रकरणाने ही बाब समोर आली आहे. अनेकदा या ‘रायटर’ सोबत मोठय़ा अधिकार्‍यांचे वाद होतात.  पण त्यांना सर्वतोपरी आश्रय दिला जात असल्याने हेच ‘रायटर’ आता भस्मासूर झाले आहेत.
पोलीस निरीक्षकाकडे गंभीर अपराध किंवा तक्रारींची तपासणी करण्यासह प्रशासकीय जबाबदारीही असते. पोलीस निरीक्षकाकडे प्रलंबित तपासणीची  केस डायरी तयार करण्यासह सर्व महत्त्वपूर्ण कामांचे दस्तावेजांची पाहणी करण्याची जबाबदारी ‘रायटर’कडे असते. या कामाच्या बदल्यात पोलीस  निरीक्षकाला मिळणारा ‘हप्ता’ आणि त्याचे व्यवस्थापन ‘रायटर’ करतात. महिन्याला लाखो रुपयांचा बंदोबस्त करून देणार्‍या‘रायटर’ समोर त्यामुळेच  निरीक्षकही नतमस्तक असतात. त्यामुळे पोलीस निरीक्षकानंतर ‘रायटर’चाच बोलबाला असतो. ठाण्यातील बड्या पदावरील अधिकारीही ‘रायटर’च्या  भानगडीत फारसे पडत नाहीत.
शहरात एकूण २३ पोलीस स्टेशन आहेत. अधिकांश पोलीस स्टेशनची सत्ता ‘रायटर’च्याच हातात आहे. एकदा ‘रायटर’चे पद मिळविल्यावर त्याला  या पदावरून हटविण्याची हिंमत कुणीच करू शकत नाही. ‘रायटर’चे काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या शक्तीचा परिचय यावरून मिळतो.
निर्धारित कालावधीचा कार्यकाळ पूर्ण केल्यावरही त्यांची बदली होण्याची शक्यता कमी असते. काही कारणाने बदली झालीच तरी नव्या जागेवर त्यांना  पुन्हा ‘रायटर’चेच पद मिळण्याची व्यवस्था करण्याची त्यांची ताकद आहे. ‘रायटर’चे काम करण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांना संगणक साक्षर असणे,  टंकलेखन करता येणे आवश्यक आहे. पण असे अनेक ‘रायटर’ आहेत ज्यांनी संगणकाच्या की-बोर्डलाही कधीच हात लावलेला नाही. ‘मनी  मॅनेजमेंट’च्या भरवशावर त्यांना टंकलेखन करणारा सहायक मिळतो. हा सहायकच ‘रायटर’चे सारे काम पाहतो. 
याच अर्थ व्यवस्थापनाच्या बळावर काही ठाण्यात गुन्हे कारवायात लिप्त असलेल्या काही पोलीस कर्मचार्‍यांना ‘रायटर’चे पद मिळाले आहे.  जरीपटका ठाण्यात एका गुन्ह्यात सापडलेल्या हवालदाराला ‘रायटर’ करण्यात आले आहे. या हवालदाराच्या सूचनेनेच २00८ साली एका गुन्हे  प्रकरण घडले होते. त्यानंतर हे दरोडेखोर गुन्हेगार चंद्रपुरात पकडले गेले.  त्यानंतर हवालदाराच्या सूचनेवरूनच त्यांनी फरार असणे मान्य केले. या  आधारावर त्या हवालदाराला अटक करण्यात आली.
दोन महिन्यानंतर जमानतीवर त्याची सुटका करण्यात आली. निलंबन संपल्यावर त्याची नियुक्ती मुख्यालयात क रण्यात आली. सध्या हा हवालदार तीन  वर्षापासून त्याच्या निरीक्षकासाठी अर्थ व्यवस्थापन पाहतो आहे.
काही काळ पोलीस निरीक्षक आणि आणि दुय्यम पोलीस निरीक्षकांमध्ये या प्रकरणावरून तणावाची स्थितीही होती. पोलीस निरीक्षक अर्थपूर्ण  व्यवहारात ‘रायटर’च्या मदतीने स्वत:च प्रकरणांचा निपटारा करतात. पण ज्या प्रकरणात काही ‘अर्थ’ नसतो. अशी प्रकरणे दुय्यम निरीक्षक किंवा  इतर अधिकार्‍यांना सोपविली जातात.
गेल्या आठवड्यात पोलीस विभागात सामान्य बदली अंतर्गत काही ‘रायटर’ला मुख्यालयात पाठविण्यात आले आहे. या अपमानाने आणि कमाई बंद  झाल्याने त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. ही बदली रद्द व्हावी म्हणून ते बड्या अधिकार्‍यांशी संगनमत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अंबाझरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण राऊतवार प्रकरणात ‘रायटर’ची भूमिकाच महत्त्वाची होती. पण सारवासारव करून त्यावर पडदा  टाकण्यात आला. ठाण्यांशिवाय सहायक आयुक्तांच्या ‘रायटर’चीही स्थिती अशीच आहे. ते अनेक वर्षांपासून अर्थ व्यवस्थापन करीत आहेत.  त्यांच्याकडे अनेकांचे दुर्लक्ष आहे.
 

Web Title: Writer writes Thanan's future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.