संप न करण्यासंदर्भात लेखी हमीला वकिलांचा नकार

By admin | Published: October 29, 2015 12:49 AM2015-10-29T00:49:44+5:302015-10-29T00:49:44+5:30

कोल्हापूरला फिरते खंडपीठासाठी संप करून न्यायालयाचे कामकाज ठप्प करणाऱ्या वकिलांना यापुढे संपावर जाणार नाही, अशी लेखी हमी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.

Written counsel for refusing to be denied | संप न करण्यासंदर्भात लेखी हमीला वकिलांचा नकार

संप न करण्यासंदर्भात लेखी हमीला वकिलांचा नकार

Next

मुंबई: कोल्हापूरला फिरते खंडपीठासाठी संप करून न्यायालयाचे कामकाज ठप्प करणाऱ्या वकिलांना यापुढे संपावर जाणार नाही, अशी लेखी हमी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.
मात्र, कोल्हापूरच्या बार असोसिएशनने अशी लेखी हमी देण्यास नकार दिल्याने खंडपीठाने हा न्यायालयाचा अवमान आहे, असे म्हणत पुढील सुनावणीस बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांना सुनावणीस हजर राहण्याचा आदेश दिला आहे. माजी मुख्य न्यायाधीश मोहीत शाह यांनी निवृत्त होण्यापूर्वी कोल्हापूर फिरते खंडपीठासंदर्भात निर्णय घेऊ, असे आश्वासन कोल्हापूरकरांना दिले होते. मात्र, मुख्य न्यायाधीशांनी फिरते खंडपीठाचे भिजते घोंगडे ठेवल्याने, कोल्हापूरच्या वकिलांनी संप पुकारला आणि मुख्य न्या. शहा यांची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली. वकिलांच्या या वर्तनाची गांभीर्याने दखल घेत, उच्च न्यायालयाने ‘सू-मोटो’ दाखल करून घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीवेळी यापुढे संपावर जाणार नाही, अशी लेखी हमी देण्याचा आदेश दिला होता. बुधवारच्या सुनावणीदरम्यान कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी खंडपीठाला सांगितले की, वकील अशी लेखी हमी देण्यास तयार नाहीत. हा न्यायालयाचा अवमान आहे. वकिलांची अशी वर्तणूक असेल, तर आम्हाला कारवाई करावीच लागेल. तसेच त्यांना आम्ही सुनावणीस गैरहजर राहण्याची मुभा देणार नाही, असे म्हणत . (प्रतिनिधी)

Web Title: Written counsel for refusing to be denied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.